अ‍ॅपशहर

Breaking News ... रोहित शर्माकडे भारतीय संघाचे नेतृत्व, बीसीसीआयने दिली मोठी माहिती

भारतीय संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची निवड यावेळी केल्याचे बीसीसीआयने जाहीर केले आहे. रोहित शर्माला २५ जूनला प्रथम करोना झाला होता. त्यानंतर त्याला पाच दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याची २९ जूनला दुसरी करोना चाचणी झाली होती आणि त्यामध्येही तो करोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले होते. पण बीसीसीआयने आता नवीन माहिती दिली आहे.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 30 Jun 2022, 11:23 pm

हायलाइट्स:

  • भारतीय संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची निवड
  • बीसीसीआयने काही मिनिटांपूर्वीच दिली माहिती
  • भारतीय संघात कोणाला मिळाली संधी, पाहा...
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम रोहित शर्मा
लंडन : भारतीय चाहत्यांसाठी आता एक मोठी बातमी आली आहे. कारण रोहित शर्माकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. बीसीसीआयने ही माहिती आत्ताच काही मिनिटांपूर्वी दिली आहे.
भारतीय संघ इंग्लंडबरोबर या दौऱ्यात एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये वनडे आणि ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्माला करोना झाल्यामुळे तो कसोटी सामन्यात खेळू शकत नाही, अशी माहिती बीसीसीआयने दिली होती. पण बीसीसीआयने आता वनडे आणि ट्वेन्टी-२० मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे आणि या दोन्ही संघांच्या कर्णधारपदी आता रोहित शर्माची नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयने यावेळी पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी वेगळा संघ निवडला आहे आणि दुसऱ्या व तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी वेगळ्या संघाची घोषणा केली आहे. त्याचबरोबर बीसीसीआयने यावेळी वनडे संघाचीही घोषणा केली आहे. भारतीय संघाचा एकमेव कसोटी आणि पहिला ट्वेन्टी-२० सामना फक्त दोन दिवसांत असल्यामुळे बीसीसीआयने असे संघ निवडले आहेत.

पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, उमरान मलिक.

तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, यजवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, अक्षर पटेल, प्रसिध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख