अ‍ॅपशहर

भारतीय क्रिकेटवर दुःखाचा डोंगर कोसळला; जलद गोलंदाजाचे २८व्या वर्षी निधन

Siddharth Sharma: देशांतर्गत क्रिकेटमध्ये हिमचाल प्रदेशच्या संघाकडून खेळणार जलद गोलंदाज सिद्धार्थ शर्मा याचे गुजरातमधील वडोदरा येथील एका रुग्णालयात निधन झाले.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jan 2023, 10:17 pm
नवी दिल्ली: हिमाचल प्रदेशचा युवा क्रिकेटपटू सिद्धार्थ शर्मा यांचे वयाच्या २८व्या वर्षी निधन झाले. सिद्धार्थ आजारी होता आणि त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. सिद्धार्थ विजय हजारे ट्रॉफीत हिमाचल प्रदेशच्या संघाकडून खेळला होता. या स्पर्धात हिमचालने विजेतेपद देखील मिळवले होते. इतक्या लहान वयात सिद्धार्थने निरोप घेतल्याने भारतीय क्रिकेट विश्वावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. हिमचालचा संघ सध्या रणजी ट्रॉफी खेळत आहे आणि सिद्धार्थ या संघासोबत होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Siddharth Sharma


सिद्धार्थ शर्माच्या निधनावर राज्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी शोक व्यक्त केला आहे. हिमाचल सीएमओने एक ट्विट केले असून, त्यात म्हटले आहे की," मुख्यमंत्री सुखविंदर सिंह यांनी हिमाचल प्रदेश क्रिकेट संघातील सदस्य आणि स्टार जलद गोलंदाज सिद्धार्थ शर्माच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे."

वाचा- महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा: फायनलचे चित्र स्पष्ट, हर्षवर्धनला ‘डबल महाराष्ट्र केसरी’ होण्याची संधी

जलद गोलंदाज सिद्धार्थ आजारी होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. काही कारणामुळे तो खेळू शकत नव्हता. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे वृत्त समोर आले होते आणि तो लवकरच संघात दाखल होईल असे म्हटले गेले. मात्र त्यानंतर अचानक त्याची प्रकृती बिघडली आणि सिद्धार्थला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वाचा- रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांचा मास्टर स्ट्रोक; वर्ल्डकपच्या आधी सापडला विजयाचा X फॅक्टर


सिद्धार्थ रणजी ट्रॉफीत संघाकडून खेळत होता. ही स्पर्धा देशातील विविध शहरात होत आहे. प्रकृती बिघडल्याने त्याला गुजरातमधील वडोदरा येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि तेथेच त्याने अखेरचा श्वास घेतला.

वाचा- प्रसिद्ध महिला क्रीडा अँकरसोबत घडला विचित्र प्रकार, मेसेजवर एक स्क्रीनशॉट आला अन्...

हिमाचलकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या सिद्धार्थचे क्रिकेट करिअर फार मोठे नव्हते. त्याने हिमचालकडून लिस्ट ए मधील ६ सामने खेळले. तर विजय हजारे ट्रॉफीत त्याने एकच टी-२० मॅच खेळली होती.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज