अ‍ॅपशहर

बुमराहचे कमबॅक; पण फक्त १२ षटके टाकता येणार!

वनडे क्रिकेटमधील जगातील क्रमांक एकचा गोलंदाज जसप्रीत बुमराहचे चार महिन्यानंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. पुढील वर्षातील पहिल्या आठवड्यात श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेत तो मैदानात दिसले. बुमराहला सप्टेंबर महिन्यात स्ट्रेस फ्रॅक्चर झाले होते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Dec 2019, 10:23 am
नवी दिल्ली: वनडे क्रिकेटमधील जगातील क्रमांक एकचा गोलंदाज जसप्रीत बुमराहचे (Jasprit Bumrah) चार महिन्यानंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. पुढील वर्षातील पहिल्या आठवड्यात श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेत तो मैदानात दिसले. बुमराहला सप्टेंबर महिन्यात स्ट्रेस फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याला खेळता आले नव्हते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Bumrah


भारतीय संघाकडून खेळण्याआधी बुमराह एक रणजी स्पर्धेतील सामना खेळणार आहे. असे असले तरी एका दिवसात त्याला फक्त १२ षटके टाकण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुखापतीतून बाहेर आलेल्या बुमराहने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान संघासोबत नेटमध्ये सराव केला होता. भारतीय संघासोबत आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याआधी बुमराहला रणजी सामना खेळण्यास सांगण्यात आले आहे. तो सूरतमध्ये केरळ विरुद्धच्या सामन्यात गुजरात संघाकडून सामना खेळणार आहे.
वाचा- टीम इंडियासाठी शानदार वर्ष; कटकमध्ये झाले हे वर्ल्ड रेकॉर्ड!
फक्त १२ ओव्हर टाकता येणार

भारतीय संघाचे मुख्य निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद हे स्वत: बुमराहच्या सुरत येथील सामना पाहणार आहेत. बुमराह गोलंदाजी करू शकतो यासंदर्भात भारतीय संघाचे फिजिओ नितीन पटेल यांनी देखील हिरवा कंदील दिला आहे. निवड समितीने बुमराह संदर्भात गुजरात रणजी संघाचा कर्णधार पार्थिव पटेल याला एक महत्त्वाची सूचना दिली आहे. बुमराह गोलंदाजी करेल पण एका दिवसात त्याच्याकडून १२ पेक्षा अधिक षटके टाकून घ्यायची नाहीत, असे पटेलला सांगण्यात आले आहे.
वाचा-'या' विजयासाठी संघाने १० वर्ष वाट पाहिली!
का दिला असा सल्ला

यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत पुढील वर्षी २१ फेब्रुवारीच्या आधी कसोटी सामना खेळणार नाही. त्यामुळेच लाल चेंडूवर बुमराहला सराव करण्याची घाई नाही. त्यामुळे भारतीय संघाचा पुढील कार्यक्रम पाहता बुमराहकडून अधिक गोलंदाजी न करून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
वाचा-विराट मराठीत म्हणाला, 'तुला मानला रे ठाकूर'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज