अ‍ॅपशहर

जनता कर्फ्यू: थाळी नाही तर CSKचा असा गजर

सायंकाळी पाच वाजता आपल्याला मदत करणाऱ्या यंत्रणा, व्यक्तींचे आभार मानण्यासाठी गजर करायला सांगितला होता. या गोष्टीला आयपीएलमधील धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने भन्नाट प्रतिसाद दिला आहे. त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला असून तो चांगलाच वायरल झालेला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Mar 2020, 7:52 pm
आज सायंकाळी पाच वाजता जवळपास सर्व नागरिकांनी टाळ्या, शंख, थाळ्या वाजवून अहोरात्र सेवा पुरवणाऱ्या व्यक्तीचे आभार मानले. यामध्ये आयपीएलमधूल चेन्नई सुपर किंग्सचा संघही मागे नाही. कारण चेन्नइ सुपर किंग्सने आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत या गोष्टीचा भन्नाट प्रतिसाद दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम wishlpodujpg


करोना व्हायरसमुळे सध्या आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. जर १५ एप्रिलला आयपीएल झाली नाही तर ही स्पर्धा रद्द कावी लागेल. पण यावेळी सर्वच संघ देशाच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. त्याचमुळे आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू लावला होता. त्याचबरोबर सायंकाळी पाच वाजता आपल्याला मदत करणाऱ्या यंत्रणा, व्यक्तींचे आभार मानण्यासाठी गजर करायला सांगितला होता. त्याला लोकांनीही चांगला प्रतिसाद दिला.

चेन्नईच्या संघाने एक व्हिडीओ आता पोस्ट केला आहे. त्यामध्ये चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, हरभजन सिंग आणि केदार जाधव दिसत आहेत. हा व्हिडीओ आत्ता केलेला नाही तर आधी शूट केला आहे. पण या व्हिडीओद्वारे आम्हीही मोदी यांच्या घोषणेला प्रतिसाद देत आहोत, हे चेन्नई सुपर किंग्सने दाखवून दिले आहे.


जनता कर्फ्यूला हॉकी खेळाडूंचा असा पाठिंबा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात जनता कर्फ्यू लावला आहे. त्याचरोबर सायंकाळी पाच वाजता त्यांनी आपल्याला सेवा देणाऱ्या व्यक्तींचे आभार मानन्यासाठी पाच मिनिटे गजर करायला सांगितला होता. देशवासियांनी या गोष्टीला चांगला प्रतिसाद दिला. भारताच्या महिला हॉकी संघानेही या गोष्टीला भन्नाट प्रतिसाद दिला आहे.

आज पाच वाजता सर्व देशवासियांनी एकत्र येत गजर केला. यामध्ये क्रीडा विश्वही मागे राहिलेले नाही. कारण भारताच्या हॉकी संघानेही पाच वाजता टाळ्यावाजून गजर केला. त्यांचा व्हिडीओ भारताचे क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.

आज संपूर्ण देशात जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जनता कर्फ्यूबाबत देशवासियांना आवाहन केले होते. त्यामुळे या जनता कर्फ्यूचे कडक पालन देशभरात केल्याचे पाहायला मिळत आहे. पण या जनता कर्फ्यूबद्दल टेनिसपटू सानिया मिर्झाने आपले मत व्यक्त केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज