अ‍ॅपशहर

Video : 'फक्त एकच... मागे लाईन लागेल'; स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाला विकेटकीपरचा आवाज

श्रीकर भरत कानपूर कसोटीच्या तिसऱ्या दिवशी यष्टीरक्षण करताना दिसला. वृद्धिमान साहा मानेचा त्रास होऊ लागल्याने मैदानात उतरू शकला नाही. विकेटमागे उभ्या असलेल्या भरतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 29 Nov 2021, 8:29 am
नवी दिल्ली : के.एस. भरतला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नव्हते, तरीही तो कानपूर कसोटीच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडविरुद्ध यष्टीरक्षण करताना दिसला. कारण टीम इंडियाचा यष्टिरक्षक वृद्धिमान साहाला मानेचा त्रास होऊ लागल्याने तो शनिवारी (२७ नोव्हेंबर) मैदानात उतरला नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ek girne se line lagegi peeche says ks bharat to axar patel recorded in stump mike ind vs nz test
Video : 'फक्त एकच... मागे लाईन लागेल'; स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाला विकेटकीपरचा आवाज


वाचा- 'माझी संघात निवड करू नका'; हार्दिक पंड्याने निवडकर्त्यांना केली विनंती

आर. अश्विनच्या गोलंदाजीवर किवी संघाचा सलामीवीर विल यंगचा भरतने अप्रतिम कमी झेल टिपला. आणि भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर त्याने अक्षर पटेलच्या चेंडूवर अनुभवी रॉस टेलर आणि टॉम लॅथमचेही उत्कृष्ट झेल घेतले.

वाचा- काहीही झाले तरी कानपूर कसोटीत भारताचा पराभव होणार नाही, हे आहे कारण...

तिसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान, किवी संघाचे फलंदाज टॉम ब्लंडेल आणि काइल जेमिसन यांच्यात सातव्या विकेटसाठी मोठी भागीदारी होताना दिसत होते. तेव्हा मैदानात एक मजेदार किस्सा घडला. अक्षर पटेल गोलंदाजी करत होता. विकेटमागे उभ्या असलेल्या भरतने अक्षरला हिंदीत सांगितले की, 'एक गिरने से लाइन लगेगी पीछे (एक बाद झाला, तर मागे लाईन लागेल.)'

वाचा- Video : सानियाच्या प्रश्नावर शोएब मलिकची बोलती बंद; म्हणाला भारताला सपोर्ट करतो


वाचा- श्रेयस अय्यरने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास घडवला, अशी कामगिरी आजवर कोणाला जमली नाही

आणि काही वेळातच अक्षरने ब्लंडेलला बाद केले. ब्लंडेलने ९४ चेंडूत १३ धावा केल्या. स्टंप माईकमध्ये भरतचा आवाज कैद झाला. अक्षरने पहिल्या डावात एकूण ५ बळी घेतले.

वाचा- काळजाचा ठोका चुकला; थ्रो मारलेला चेंडू अंपायरच्या डोक्याला लागला, पाहा Video



वाचा- कोरोनाचा नवा विषाणू: भारतीय संघ आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार का? आली मोठी अपडेट

साहाच्या ११ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे उत्कृष्ट यष्टिरक्षण हे अजूनही चांगले आहे, पण पर्यायी यष्टीरक्षक म्हणून श्रीकर भरतची निवड करण्यात आली आहे. पहिल्याच सामन्यात विकेट्समागे भरतची कामगिरी पाहता ३७ वर्षीय बंगालच्या यष्टीरक्षकाची झोप उडवायला पुरेशी आहे.

शनिवारी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वी साहाने मान अवघडल्याची तक्रार केली आणि त्याच्या जागी दुसरा यष्टिरक्षक भरतला खेळविण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज