अ‍ॅपशहर

बुमराह इज बॅक; इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत केला हा विक्रम

eng vs ind 1st test match jasprit bumrah: इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहने दोन विक्रम स्वत:च्या नावावर केलेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Aug 2021, 12:30 pm
नॉटिंघम: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी पावसामुळे ड्रॉ झाली. भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवण्याची संधी होती. अखेरच्या दिवशी भारताला १५७ धावांची गरज होती आणि ९ विकेट शिल्लक होत्या. या सामन्यानंतर बीसीसीआयने कर्णधार विराट कोहलीचा एक फोटो शेअर केला आहे ज्यात तो पॅव्हेलियनच्या बाल्कनीत उभा राहून आकाशाकडे पाहत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम जसप्रीत बुमराह


पहिल्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. त्यांनी दोन वेळा इंग्लंडच्या संपूर्ण संघाला बाद केले. भारतीय गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहने ९ विकेट घेतल्या. पहिल्या डावात त्याने ४ आणि दुसऱ्या डावात ५ विकेट घेतल्या.

वाचा- विजयाची संधी गमावल्यानंतर देखील विराट कोहील आणि रवी शास्त्री खुश आहेत

बुमराहच्या या कामगिरीमुळे त्याने एक नवा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. गेल्या काही मालिकेत बुमराहची कामगिरी चांगली झाली नव्हती. पण या सामन्यात त्याने जोरदार कमबॅक केले. इंग्लंडविरुद्धची कसोटी बुमराहची ही २१वी कसोटी होती. कसोटी त्याच्या नावावर आता ९२ विकेट झाल्या आहेत. भारताकडून २१ कसोटीत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. याबाबत बुमराहने इरफान पठाणचा विक्रम मागे टाकला. पठाणने २१ कसोटीत ८१ विकेट घेतल्या होत्या. तर कपील देव यांनी २१ कसोटीत ७९ विकेट, मोहम्मद शमीने २१ कसोटीत ७१, श्रीसंतने २१ कसोटीत ७० घेतल्या होत्या. याबाबत अनिल कुंबळे अव्वल स्थानी आहे. त्याने २१ कसोटीत १०८ विकेट घेतल्य होत्या. बुमराहच्या पुढे सहा असे भारतीय गोलंदाज आहेत त्यांनी २१ कसोटीत त्याच्यापेक्षा अधिक विकेट घेतल्या. पण ते सर्व फिरकीपटू आहेत.

वाचा- मेस्सी ढसाढसा रडत म्हणाला, ५० टक्के पगार कपात करण्याची ऑफर दिली पण त्यांनी ऐकले नाही


इंग्लंडमधील सर्वोत्तम कामगिरी

जसप्रीत बुमराहने ११० धावा देत ९ विकेट घेतल्या. अशी कामगिरी करत त्याने जहीर खानचा विक्रम मागे टाकला. इंग्लंडमध्ये एका कसोटीत सर्वोत्तम कामगिरी करणारा बुमराह दुसरा जलद गोलंदाज ठरला आहे. जहीर खानने इंग्लंडमध्ये १३६ धावा देत ९ विकेट घेतल्या होत्या. या यादीत चेतन शर्मा अव्वल स्थानी आहेत. त्यांनी एका कसोटीत १८८ धावा देत १० विकेट घेतल्या आहेत.


या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला धावा करता आल्या नाहीत. तो पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. या शिवाय चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे हे अनुभवी फलंदाज अपयशी ठरले. या उटल इंग्लंडचा कर्णधार जो रुटने दुसऱ्या डावात १०९ धावा केल्या. रुटचे हे कसोटीतील २१वे शतक होते. त्याच्या शतकामुळे इंग्लंडला दुसऱ्या डावात ३०३ धावा करता आल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज