अ‍ॅपशहर

पराभवानंतर देखील होतंय कर्णधार बुमराहचे कौतुक; मॅच झाल्यानंतर पाहा काय केले

Jasprit Bumrah IND vs ENG: भारताने इंग्लंडविरुद्धची पाचवी कसोटी गमावली असली तरी संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराह यांचे सर्वजण कौतुक करत आहेत जाणून घ्या काय झाले.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jul 2022, 1:37 pm
नवी दिल्ली: इंग्लंडविरुद्धची पाचवी कसोटी भारतीय संघाने ७ विकेटनी गमावली. या सामन्यात भारताने पहिले ३ दिवस आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या डावातील खराब फलंदाजी आणि गोलंदाजीने भारताचा पराभव झाला. या सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) करत होता. पाचवा सामना गमावल्याने भारताचे मालिका जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Jasprit Bumrah Champagne
जसप्रीत बुमराह


पाचव्या सामन्यात कर्णधार बुमराहने १०० टक्के दिले. दोन्ही डावात त्याने सुरुवातीला विकेट घेतल्या आणि संघाला आघाडी मिळून दिली. पण त्यानंतर अन्य गोलंदाजांची पुरेशी साथ मिळाली नाही. बुमराहला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. एका बाजूला पराभवानंतर भारतीय संघावर टीका होत आहे. मात्र जसप्रीत बुमराहचे सर्वजण कौतुक करत आहेत.

वाचा- भारताच्या पराभवावर कोच द्रविड यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, मला कोणतेही...

मालिकावीर पुरस्कार मिळाल्यानंतर बुमराहला पदक घेण्यासाठी बोलवले तेव्हा पदकासोबत शॅपेनची बाटली देखील ठेवली होती. पण बुमराहने ती घेतली नाही. इंग्लंडमध्ये मालिकावीर आणि सामनावीर पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूला शॅपेन भेट दिली जाते. भारताचा ७ विकेटनी पराभव झाल्यानंतर शॅपेन घेतली नाही आणि मालिकावीर पुरस्काराचा आनंद साजरा केला नाही.

वाचा- इंग्लंडच्या Bazball क्रिकेटवर राहुल द्रविडने दोन शब्दात विषय संपवला, पाहा व्हायरल व्हिडिओ

स्वत:च्या पुरस्कारापेक्षा संघाचा विजय अधिक महत्त्वाचा मानणाऱ्या बुमराहच्या या कृतीचे सर्वजण कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पदक घेतल्यानंतर तो इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू आणि अँकर मार्क बुचरकडे जातो.


रोहित शर्माच्या गैरहजेरीत संघाचे नेतृत्व करणाऱ्या बुमराहने पराभवानंतर मान्य केले की, अधिक चांगली गोलंदाजी करता आली असती. त्यामुळेच इंग्लंड मजबूत स्थितीत आले. पाच सामन्यांच्या मालिकेत बुमराहने २२.४७च्या सरासरीने २३ विकेट घेतल्या. इंग्लंडमध्ये एका कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज ठरलाय.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज