अ‍ॅपशहर

पंतच्या शतकाने इंग्लंडचा अहंकार मोडला आणि जागा झाला 'इंद्रानगरचा गुंड'

Ind vs Eng 5th Test Day 1 Highlights: टॉस जिंकून इंग्लंडने भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले आणि १०० धावांच्या आतच भारताने ५ विकेट गमावल्या होत्या. पण त्यानंतर ऋषभ पंतने इंग्लंडला धडा शिकवला.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jul 2022, 9:12 am
बर्मिंगहॅम: इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने १०० धावांपर्यंत ५ विकेट गमावल्या होत्या. पण त्यानंतर ऋषभ पंतने इंग्लंडच्या गोलंदाजांच्या समाचार घेतला. त्याने रविंद्र जडेजा सोबत इंग्लंडचा अहंकार मोडला. या दोघांची फलंदाजी पाहून शांत आणि संयमी असणारे भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना इतका जोश आला की ते बाल्कनीत येऊन चीयर करू लागले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rishabh Pant


नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करण्यास उतरलेल्या भारतीय संघाने ९८ धावांवर पाच विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर पंत आणि जडेजा यांनी डाव सावरला. या दोघांनी आक्रमक फलंदाज करत २३९ चेंडूत २२२ धावा कुटल्या.

वाचा- विराट कोहलीने धोड्यांवरच पाय मारला, बाद झाल्याचा Video पाहाल तर कपाळावर हात माराल

पंत ज्या परिस्थितीत फलंदाजी करण्यास आला होता. ते पाहता अन्य कोणी असता तर थोडी संयमी फलंदाजी केली असती. पण पंतने थेट हल्ला चढवला. पंतचा राग खास करून फिरकीपटू जॅक लीचवर निघाला, त्याच्या एका ओव्हरमध्ये पंतने २२ धावा वसूल केल्या.

पंतने १११ चेंडूत १९ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने १४६ धावा केल्या. १५० धावा होतील असे वाटत असताना जो रूटच्या चेंडूवर जॅक क्रॉलीने पंतचा कॅच घेतला. पंतने शतक पूर्ण केल्यावर भारताचे कोच द्रविड यांना सर्वात जास्त आनंद झाला. नेहमी शांत आणि संयमी दिसणारे द्रविड यांनी मात्र उत्साहात बाल्कनीत आले आणि त्यांनी पंतचे अभिनंदन केले. द्रविडने एका जाहिरातीत इंद्रानगरचा गुंड अशी व्यक्तीरेखा साकारली होती. काल बाल्कनीतील द्रविडचा जल्लोष पाहून चाहत्यांना त्या जाहिरातीची आठवण आली.



वाचा- जाणून घ्या कोण आहे गेरार्ड पिक; शकीराने महिलेसोबत रंगेहात पकडले आणि...

सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जडेजाने पंतला सुरेख साथ दिली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा जडेजा १६३ चेंडूत ८३ धावांवर नाबाद होता. पहिल्या सत्रात इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताला बॅकफुटला ढकलले होते. पण त्यानंतर पंत-जडेजा जोडीने धमाल केली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सकडे याचे उत्तर नव्हते. त्याने मुख्य गोलंदाज वापरून पाहिले पण पंत-जडेजा जोडीला रोखता आले नाही.

वाचा- टॉपलेस होऊन महिला Live सामन्यात मैदानात घुसली; फोटो, व्हिडिओची जगभरात चर्चा

पंतने ८९ चेंडूत शतक पूर्ण केले. याच बरोबर त्याने महेंद्र सिंह धोनीचा २००६ मधील विक्रम मागे टाकला. धोनीने पाकिस्तानविरुद्ध ९३ चेंडूत शतक केले होते. आशिया खंडाच्या बाहेर भारताकडून झालेले हे तिसऱ्या क्रमांकाचे वेगवान शतक आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ७ बाद ३३८ धावा केल्या होत्या. जडेजासोबत मोहम्मद शमी मैदानावर आहेत.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख