अ‍ॅपशहर

इंग्लंडच्या कर्णधाराचा अनोखा विश्वविक्रम, आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासात झाली नाही अशी कामगिरी...

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने अशी कामगिरी केली आहे की जी आतापर्यंत कोणालाही करता आली नाही. क्रिकेटच्या इतिहासामध्ये रुटसारखी कामगिरी कोणत्याही खेळाडूला आतापर्यंत करता आलेली नाही.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jan 2021, 4:44 pm
नवी दिल्ली : इंग्लंडचा कर्णधार जो रुटने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात अशी कामगिरी केली आहे की, आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासामध्ये अशी कामगिरी पाहायलाच मिळाली नाही. त्यामुळे रुटचे यावेळी क्रिकेट विश्वात कौतुक होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम इंग्लंडचा संघ


श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रुटने कमालच केली. गॉल येथे सुरु असलेल्या या कसोटी सामन्यात रुटने श्रीलंकेचे दोन विकेट्स पटकावले. पण हे दोन विकेट्स मिळवताना रुटने एकही धाव दिली नाही. आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासामध्ये अशी कामगिरी कोणत्याही खेळाडूला करता आलेली नाही. पण त्याचबरोबर रुटने या सामन्यात दमदार फलंदाजी केल्याचेही पाहायला मिळाले. रुटच्या दमदार फलंदाजीमुळेच इंग्लंडवर फॉलोऑनची वेळ आली नाही. पण जर रुटने ही खेळी साकारली नसती तर नक्कीच इंग्लंडवर फॉलोऑन आला असता. त्यामुळे या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात रुटची कामगिरी भन्नाट अशीच झाली आहे.

या दुसऱ्या सामन्यात रुटने १.५ षटके गोलंदाजी केली. यामधील एक षटक निर्धाव टाकले, त्याचबरोबर त्याच्या या ११ चेंडूंमध्ये एकही धाव घेतली गेली नाही. पण रुटने यावेळी श्रीलंकेच्या लसिथ एमबुलडेनियाला जॉनी बेअरस्टोव्हकरवी झेलबाद केले. त्यानंतर रुटने श्रीलंकेच्या असिथा फर्नांडोला क्लीन बोल्ड करत आपली दुसरी विकेट मिळवली. पण या दोन्ही विकेट्स मिळवताना रुटने एकही धाव दिली नाही आणि आतापर्यंत अशी कामगिरी क्रिकेट विश्वात कोणालाही करता आली नाही. रुटच्या या भेदक गोलंदाजीमुळेच श्रीलंकेचा दुरा डाव १२६ धावांवर आटोपला आणि इंग्लंडपुढे विजयासाठी १६४ धावांचे आव्हान देण्यात आले.

रुटने दुसऱ्या कसोटी सामन्यात धडाकेबाज फलंदाजीही केली. इंग्लंडच्या संघाची पहिल्या डावात २ बाद ५ धावा अशी बिकट अवस्था असताना रुट फलंदाजीला आला. यावेळी रुटने १८ चौकारांच्या जोरावर १८६ धावांची दमदार खेळी साकारली. रुटच्या या खेळीमुळेच इंग्लंडवर फॉलोऑनची आपत्ती आली नाही. रुटच्या १८६ धावांमुळे इंग्लंडला पहिल्या डावात ३४४ धावा करता आल्या होत्या. त्याच्या या खेळीमुळेच इंग्लंडच्या संघाचे या सामन्यातील आव्हान कायम राहीले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज