अ‍ॅपशहर

फाफ डू प्लेसीने दिला कर्णधारपदाचा राजीनामा

दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या आधी एक मोठा धक्का बसला आहे. संघातील धडाकेबाज फलंदाज फाफ डू प्लेसीने कसोटी, वनडे आणि टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Feb 2020, 2:16 pm
नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या आधी एक मोठा धक्का बसला आहे. संघातील धडाकेबाज फलंदाज फाफ डू प्लेसीने कसोटी, वनडे आणि टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. डू प्लेसीसने कर्णधारपदाचा राजीनामा दिला असला तरी तो संघाकडून खेळणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Faf-du-Plessis


डू प्लेसीसने राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने देखील दुजोरा दिला आहे. नव्या पिढीतील खेळाडूला कर्णधारपदासाठी संधी दिली पाहिजे म्हणून मी राजीनामा देत आहे. संघ डी कॉकच्या नेतृत्वाखाली चांगील कामगिरी करत असल्याचे असे ३५ वर्षीय डू प्लेसीने म्हटले आहे.

वाचा- बांगलादेशच्या खेळाडूने सांगितले 'डर्टी' जल्लोषाचे खरे कारण!

संघात फलंदाज म्हणून आणि एक सिनिअर खेळाडू म्हणून यापुढेही योगदान देणार असल्याचे डू प्लेसीने म्हटले आहे. नव्या खेळाडूंना मार्गदर्शन करणे आणि संघ नियोजनामध्ये या पुढे माझा सहभाग असेल. माझ्या आयुष्यातील सन्मानाची गोष्ट आहे की मला देशाच्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. आफ्रिकन क्रिकेटने एका नव्या युगात प्रवेश केला आहे. नवे नेतृत्व, नवे खेळाडू, नवी आव्हाने आणि नवी रणनीतीने संघाला खेळावे लागणार आहे. संघातील एक खेळाडू म्हणून मला खेळण्याची इच्छा असल्याचे डू प्लेसीने सांगितले.

वाचा- टी-२०तील वादळी खेळी; २१ चेंडूत केले अर्धशतक!


वाचा- टी-२० वर्ल्ड कपसाठी आफ्रिकेचा 'एबी' प्लॉन

डू प्लेसीला नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. या मालिकेत विकेटकीपर डी कॉकने संघाचे नेतृत्व केले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज