अ‍ॅपशहर

भारताच्या विजयासाठी विराट कोहलीला साकडं, प्लीझ.. फक्त ही मोठी चूक पुन्हा करू नकोस...

इंग्लंडने शतक झळकावले तरीही भारताला विकेट मिळाली नव्हती. भारताला १०७ धावांवर पहिली विकेट मिळाली. त्यानंतर भारताने दोन धावांत दोन विकेट्स मिळवले. त्यामुळे इंग्लंडची ३ बाद १०९ अशी अवस्था झाली. त्यावेळी भारतीय चाहत्यांमध्ये विजयाची आशा पल्लवित झाली. पण त्यावेळी भारताचे चाहत्यांनी विराट कोहलीला साकडं घातल्याची जोरदार चर्चा सुरु होती. भारतीय चाहत्यांनी कोहलीला काय साकडं घातलं, पाहा..

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 4 Jul 2022, 9:28 pm

हायलाइट्स:

  • भारताने इंग्लंडची बिनबाद १०७ वरून ३ बाद १०९ अशी अवस्था केली.
  • त्यानंतर भारतीय चाहत्यांमध्ये विजयाची आशा निर्माण झाली.
  • पण चाहत्यांनी भारताच्या विजयासाठी विराट कोहलीला काय साकडं घातलं आहे, पाहा...
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम विराट कोहली (सौजन्य-ट्विटर)
बर्मिंगहम : भारतीय संघ आता विजयाच्या मार्गावर परतला आहे, असे म्हटले जात आहे. भारताला पहिली विकेट मिळवण्यासाठी जास्त वेळ लागला असला तरी त्यानंतर त्यांनी इंग्लंडचे तीन फलंदाज दोन धावांत बाद केले. त्यामुळे भारतीय संघ विजयाचे स्वप्न पाहत आहे. पण त्याचवेळी भारताचे चाहते मात्र सतर्क झाले आहेत. यावेळी भारताच्या चाहत्यांनी भारताच्या विजयासाठी विराट कोहलीला साकडं घातलं आहे. हे साकडं घालताना पुन्हा एकदा तू चूक करू नकोस, असेही चाहते म्हणत आहेत.
भारतीय चाहते विराट कोहलीला साकडं का घालत आहेत, जाणून घ्या...
इंग्लंडच्या सलामीवीरांनी शतक ओलांडले तरी भारताला विकेट मिळत नव्हती. भारताला पहिली विकेट मिळाली तेव्हा इंग्लंडच्या १०७ धावा झाल्या होत्या. त्यानंतर भारताने इंग्लंडची ३ बाद १०९ अशी अवस्था केली होती, याचाच अर्थ भारताने इंग्लंडला फक्त दोन धावांत तीन धक्के दिले होते. त्यानंतर भारतीय संघ विजय मिळवू शकतो, अशी आशा चाहत्यांच्या मनात पल्लवित झाली. पण त्याचवेळी चाहत्यांनी कोहलीच्या एका गोष्टीचा धसका घेतल्याचे पाहायला मिळाले. कारण कोहलीकडून पहिल्या डावात एक मोठी चूक घडली होती.
विराट कोहलीकडून कोणती चूक घडली होती, जाणून घ्या...
पहिल्या डावात जॉनी बेअरस्टोने शतक झळकावले, हे सर्वांनाच माहिती आहे. पण जॉनीला मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर चांगली फलंदाजी करता येत नव्हती, तो बऱ्याचदा चुकत होता. त्यावेळी कोहली आक्रमक झाला आणि त्याला फलंदाजी कशी करायची हे शिकवायला गेला. कोहलीने यावेळी जॉनीला डिवचले. जॉनीही यावेळी शांत बसला नाही आणि कोहलीला भिडल्याचे पाहायला मिळाले. पण या सर्व गोष्टीचा परीणाम जॉनीच्या फलंदाजीवर झाल्याचे पाहायला मिळाले. कारण त्यानंतर जॉनीने मैदानात आक्रमकता दाखवली आणि भारताच्या गोलंदाजीचा समाचार घ्यायला सुरुवात केली. जॉनीने त्यानंतर धडाकेबाज शतकही झळकावले. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात फॉलोञनची नामुष्की टाळता आली होती. त्यामुळे कोहलीने जर पुन्हा एकदा जर इंग्लंडच्या कोणत्याही खेळाडूला डिवचले आणि तो आक्रमकपणे खेळायला लागला तर त्याचा फटका भारताला पुन्हा बसू शकतो. त्यामुळे भारताच्या विजयासाठी कोहलीने शांत राहणेही गरजेचे आहे.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख