अ‍ॅपशहर

इम्रान खान अतिरेक्यांच्या हातचे बाहुले: कैफ

भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. इम्रान खान हे एक दिग्गज क्रिकेटपटू होते, मात्र आता ते पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांच्या हातातील बाहुले बनले आहेत, अशा शब्दात कैफ याने इम्रान खान यांचा उल्लेख केला आहे. पाकिस्तान हा देश दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असल्याचे सांगत कैफ याने इम्रान खान यांच्या भाषणाचीही खिल्ली उडवली. इम्रान खान यांचे एक भाषण ट्विट करत कैफ याने इम्रान खान यांना चांगलेच सुनावले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Oct 2019, 11:53 am
नवी दिल्ली: भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. इम्रान खान हे एक दिग्गज क्रिकेटपटू होते, मात्र आता ते पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांच्या हातातील बाहुले बनले आहेत, अशा शब्दात कैफ याने इम्रान खान यांचा उल्लेख केला आहे. पाकिस्तान हा देश दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असल्याचे सांगत कैफ याने इम्रान खान यांच्या भाषणाचीही खिल्ली उडवली. इम्रान खान यांचे एक भाषण ट्विट करत कैफ याने इम्रान खान यांना चांगलेच सुनावले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kaif-criticizes-imran-khan


इम्रान खान यांना उद्देशून कैफ म्हणतो, ' होय, तुमचा देश पाकिस्तानला दहशतवादाशी बरेच काही घेणे-देणे आहे. पाकिस्तान हा दहशवाद्यांसाठी एक सुरक्षित ठिकाण आहे. संयुक्त राष्ट्रांमधील आपले भाषण अत्यंत दुर्दैवी होते. एक महान क्रिकेटपटू लष्कर आणि दहशतवाद्यांच्या हातातले बाहुले बनले आहे.'

संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीच्या ७४ व्या सत्रात इम्रान खान यांचे भाषण झाले. या भाषणावर जगभरातून टीका झाली. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली यानेही इम्रान खान यांच्या संयुक्त राष्ट्रांतील भाषणावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. हे भाषण म्हणजे निव्वळ बडबड असल्याचे गांगुलीने म्हटले होते. 'ज्याला संपूर्ण जग ओळखते, तो हा क्रिकेटपटू नाही', असा शब्दांत गांगुलीने इम्रान खान यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.

वाचा: ...म्हणून सौदीने इम्रान यांना विमानातून ...


सौरभ गांगुलीने इम्रान खान यांच्यावर टीकास्त्र सोडण्यापूर्वी भारताचा माजी सलामीचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांनेही इम्रान खान यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. सेहवागने एक व्हिडिओ शेअर करत लिहिले होते, ' अँकरने म्हटले की, तुम्ही ब्राँक्समधील (अमेरिकेतील एक शहर) एखाद्या वेल्डरप्रमाणे बोलत आहात.' या नंतर आणखी टीका करताना सेहवागने लिहिले होते की, 'काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रांमध्ये दिलेल्या निराशाजनक भाषणानंतर हा माणूस स्वत:लाच अपमानीत करण्यासाठी नवे-नवे मार्ग शोधताना दिसतो आहे.' इम्रान खान यांच्या या भाषणावर मोहम्मद शमी, हरभजन सिंह आणि इरफान पठाण यांनीही टीकास्त्र सोडलेले आहे.

इम्रान खान यांच्यावर टीका करताना हरभजन सिंहने म्हटले होते की, 'इम्रान खान याच्या संयुक्त राष्ट्रांमधील भाषणात भारताविरोधी संभाव्य अणु युद्धाचे संकेत होते. एक प्रतिष्ठित खेळाडू असलेल्या इम्रान खान यांनी 'हिंसाचार' आणि 'लढाई'सारख्या शब्दांचा वापर केला. या शब्दांमुळे दोन्ही देशांदरम्यान द्वेषच पसरणार आहे. एका खेळाडू म्हणून त्यांनी शांतीचा संदेश देण्याची त्यांच्याकडून अपेक्षा होती.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज