अ‍ॅपशहर

... आता क्रिकेटपटूंच्या कानाखालीच वाजवावी लागणार, भडकलेल्या अर्जुना रणतुंगांचे खळबळजनक वक्तव्य

श्रीलंकेचे विश्वविजेते कर्णधार अर्जुन रणतुंगा आता चांगलेच भडकलेले पाहायला मिळत आहे. कारण त्यांनी खेळाडूंच्या चक्क कानाखाली आवाज काढण्यासारखे खळबळजनक वक्तव्य केले आहे. रणतुंगा भडकल्यावर नेमकं काय म्हणाले आहेत, पाहा...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Jul 2021, 3:46 pm
नवी दिल्ली : क्रिकेट विश्वात एक अशी धक्कादायक गोष्टी घडील आहे की, एक विश्वविजेता कर्णधार आता चांगलाच भडकला आहे. गैरवर्तन करणाऱ्या या खेळाडूंच्या आता कानाखालीच वाजवावी लागणार असल्याचे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम रणतुंगा (सौजन्य-ट्विटर)


रणतुंगा नेमकं काय म्हणाले, पाहा...
या सर्व प्रकरणाबाबत रणतुंगा म्हणाले की, " सध्याच्ये क्रिकेटपटू हे क्रिकेट सोडून सर्व काही करताना दिसतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ टाकताना दिसतात. या खेळाडूंचे क्रिकेटवरचे लक्ष उडालेले आहे आणि त्यांना प्रसिद्धीचा हव्यास आहे. त्यांना सुधारण्यासाठी मला त्यांच्या कानाखालीच आवाज काढावा लागेल."

नेमकं घडलं तरी काय, पाहा....
श्रीलंकेचे विश्वविजेते कर्णधार अर्जुन रणतुंगा आता चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले आहे. इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेत श्रीलंकेचा दारूण पराभव झाला होता. इंग्लंडने मालिका ३-०ने जिंकली होती. मालिका गमावल्याच्या रात्री श्रीलंकेचे क्रिकेटपटू डरहमच्या रस्त्यावर फिरताना दिसले होते. हे तीनही खेळाडू तिसऱ्या सामन्यात खेळले होते. संघातील दोन खेळाडू कुसाल मेंडिस आणि निरोशन डिकवेला यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये दोघेही रस्त्यावर सिगारेट ओढताना दिसत होते. तर सलामीवीर धनुष्का देखील बायो बबलमधून बाहेर पडला होता. या खेळाडूंनी मास्क देखील घातला नव्हता. खेळाडूंनी हॉटेलमधून बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. तरी देखील हे खेळाडू बाहेर पडले. या घटनेनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावरून जोरदार टीका केली होती. त्यानंतर या खेळाडूंवर बंदीची कारवाईही करण्यात आली. क्रिकेपटूला न शोभणारे कृत्य या खेळाडूंनी केले होते, त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीकाही करण्यात आली होती.

भारतीय संघाबाबत काय म्हणाले होते, पाहा...णतुंगा यांनी सांगितले, हा भारताचा दुय्यम संघ आहे आणि त्याचे येथे येणे हा आपल्या क्रिकेटचा अपमान आहे. मी टीव्ही मार्केटिंगची गरज पूर्ण करण्यासाठी त्यांच्या(भारत) सोबत खेळण्यास तयारी दाखवणाऱ्या सद्याच्या क्रिकेट प्रशासनाला दोषी मानतो. त्यामुळे हा सर्व प्रकार मला मान्य नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज