अ‍ॅपशहर

Viral Video : कॅच घेण्यासाठी फलंदाजाचे धरले पाय!

टी-२० क्रिकेटमुळे मैदानावर अनेक तुफान खेळी पाहायला मिळतात. पण त्याच बरोबर क्रिकेटच्या मैदानावर वाद आणि गंमतीशीर प्रकार देखील होत असतात. अशाच एका गंमतीशीर प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Mar 2020, 10:50 am
नवी दिल्ली: टी-२० क्रिकेटमुळे मैदानावर अनेक तुफान खेळी पाहायला मिळतात. पण त्याच बरोबर क्रिकेटच्या मैदानावर वाद आणि गंमतीशीर प्रकार देखील होत असतात. अशाच एका गंमतीशीर प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत कॅच पकडण्यासाठी विकेटकीपरने चक्क फलंदाजाचे पायच धरले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cricket


पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेचा पाचवा हंगाम सध्या सुरू आहे. या स्पर्धेत लाहोर कलंदर विरुद्ध कराची किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा- करोना: भारतीय क्रिकेटपटूने विमानात घातला मास्क!

लाहोर कलंदर संघाचा फलंदाज बेन डंकला बाद करण्यासाठी कराची किंग्सचा विकेटकीपर वॉल्टन याने चक्क त्याचे पायच पकडले. सामन्यातील १०व्या षटकात डंकने कॅमरन डेलपोर्टच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटला लागून हवेत उडाला. इतक्यात विकेटकीपर वॉल्टन कॅच घेण्यासाठी पुढे आला पण त्याला काही चेंडू सापडला नाही. उलट वॉल्टनने डंकचे दोन्ही पायच पकडले.



हा व्हिडिओ पाकिस्तान सुपर लीगने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यारो यही दोस्ती है, किस्मत से जो मिली है, अशी ओळ त्यांनी लिहली आहे. या व्हिडिओवर युझर्स देखील प्रतिक्रिया देत आहेत.

सामन्यात लाहोरने कराची संघाचा ८ विकेटनी पराभव केला. लाहोरकडून डंकने ४० चेंडूत ९९ तर अॅलेक्स हेल्सने ४८ चेंडूत ८८ धावांची खेळी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज