अ‍ॅपशहर

शहीद जवानांच्या मुलांबरोबर गंभीरने साजरी केली रंगपंचमी

सामाजिक बांधिलकी म्हणून या रंगपंचमीच्या सणाच्या दिवशी भारताचा माजी कर्णधार आणि खासदार गौतम गंभीरने शहीद जवानांच्या मुलांबरोबर रंगपंचमीचा सण साजरा केला. गंभीरने आपल्या ट्विटरवर या गोष्टीचे फोटोही पोस्ट केले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Mar 2020, 2:53 pm
सणांमध्ये सर्व जणं एकत्र येऊन आनंद साजरा करतात. पण आपल्या देशासाठी, आपल्यासाठी जे आपल्या जीवाची आहुती देतात त्या शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी आपण काय करतो, याचे उत्तर आपल्याकडे नसते. पण सामाजिक बांधिलकी म्हणून या रंगपंचमीच्या सणाच्या दिवशी भारताचा माजी कर्णधार आणि खासदार गौतम गंभीरने शहीद जवानांच्या मुलांबरोबर रंगपंचमीचा सण साजरा केला. यावेळी गंभीरने आपल्या ट्विटरवर या गोष्टीचे फोटोही पोस्ट केले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gambhir holi



भारतीय क्रिकेटपटूंनी साजरी केली अशी रंगपंचमी
सध्याच्या घडीला भारताचे क्रिकेटपटू सुट्टीवर आहेत. त्यामुळे आपल्या कुटुंबियांबरोबर भारताचे खेळाडू हे रंगपंचमी साजरी करताना दिसत आहे. त्याचबरोबर या खेळाडूंचे रंगपंचमीचे फोटो चांगलेच वायरल झालेले पाहायला मिळत आहे.

भारताचा सलामीवीर शिखर धवनने यावेळी आपल्या कुटुंबियांबरोबर रंगपंचमी साजरी केली आहे. धवनने यावेळी पत्नी आयशा आणि मुलाबरोबर रंगपंचमी साजरी केली आहे आणि आपला फोटो त्याने ट्विटकवर पोस्ट करत चाहत्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.


भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याने आपल्या कुटुंबियांचा रंगपंचमीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्याबरोबर भाऊ कृणाल, वहिनी आणि गर्लफ्रेंडही दिसत आहे.


भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगनेही पत्नी गीता बसरा आणि मुलीबरोबरचा रंगपंचमीचा फोटो शेअर केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज