अ‍ॅपशहर

कॅप्टन झाल्यावर हार्दिक पंड्याचा रंग बदलला; आयर्लंडच्या दौऱ्यावर आता काय केलं, जाणून घ्या...

हार्दिककडे भारताचे कर्णधारपद देण्यात आले. त्यामुळे हार्दिकला आता भारताचा संघ बांधायचा आहे आणि त्यांच्याकडून चांगली कामगिरी करवून घ्यायची आहे. भारताचे खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी सरावासाठी उतरले नव्हते, त्यापूर्वीच रोहितने मैदानातत उतरत आपला फिटनेस दाखवला आणि एक आदर्श कर्णधार कसा असावा, हे सर्वांना दाखवून दिले. पण या गोष्टीच्या उलट आता हार्दिककडून पाहायला मिळत आहे.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 24 Jun 2022, 8:42 pm
नवी दिल्ली : हार्दिक पंड्याला आयर्लंडच्या दौऱ्यासाठी कर्णधार बनवण्यात आले आहे. हार्दिकला कर्णधारपद मिळाले आणि त्यानंतर त्याचा रंग बदलल्याचे पाहायला मिळाले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम हार्दिक पंड्या (सौजन्य-ट्विटर)


हार्दिकला यावेळी आयपीएलमध्ये गुजरातच्या संघाने नेतृत्व सोपवण्यात आले होते आणि त्याच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या संघाला जेतेपद पटकावता आले होते. त्यानंतर हार्दिकची भारतीय संघाच निवड झाली. भारतीय संघात हार्दिकला उप कर्णधारपद देण्यात आले होते. भारताचा कर्णधार असलेला रिषभ पंत हा इंग्लंडला जाणार असल्याने आयर्लंडच्या दौऱ्यासाठी हार्दिकला कर्णधार बनवण्यात आले. या दौऱ्यासाठी भारतीय संघ रवाना झाला. पण त्यांच्यामध्ये हार्दिक कुठेच नसल्याचे पाहायला मिळाले. हार्दिक एक दिवस उशिरा आयर्लंडला पोहोचल्याचे आता पाहायला मिळत आहे. काही मिनिटांपूर्वीच तो आयर्लंडमध्ये दाखल झाला आहे. हार्दिककडे भारताचे कर्णधारपद देण्यात आले. त्यामुळे हार्दिकला आता भारताचा संघ बांधायचा आहे आणि त्यांच्याकडून चांगली कामगिरी करवून घ्यायची आहे. त्यासाठी हार्दिकने संघाबरोबर या दौऱ्यावर जाणे अपेक्षित होते. रोहित शर्मा हा थेट इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार असला तरी तो भारतीय खेळाडूंच्या पूर्वीच मैदानात सरावासाठी उतरला होता. भारताचे खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी सरावासाठी उतरले नव्हते, त्यापूर्वीच रोहितने मैदानातत उतरत आपला फिटनेस दाखवला आणि एक आदर्श कर्णधार कसा असावा, हे सर्वांना दाखवून दिले. पण या गोष्टीच्या उलट आता हार्दिककडून पाहायला मिळत आहे. दक्षिण आफ्रिकेची मालिका संपल्यावर सर्व खेळाडू आयर्लंडच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. पण हार्दिकने यावेळी संघाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला नाही तर त्याने एक ब्रेक घ्यायचे ठरवले आणि संघ रवाना झाल्यावरही तो भारतामध्येच होता. त्यामुळे आता हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद आल्यावर त्याचे रंग बदलले आहेत, अशी टीका भापताचे चाहते करत आहेत. त्यामुळे आता हार्दिक या टीकाकारांना कसे उत्तर देतो, याची उत्सुकता सर्वांना असेल. भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये दोन ट्वेन्टी-२० सामने होणार आहे. त्याचबरोबर हाच संघ इंग्लंडच्या दौऱ्यावरही जाणार आहे.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख