अ‍ॅपशहर

पदार्पणाच्या सामन्यात हर्षल ठरला हिरो; डिव्हिलियर्सने सांगितलेली 'ती' गोष्ट कधीच विसरणार नाही

IND vs NZ T20I :हर्षल पटेल आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला. विशेष म्हणजे त्याच दिवशी त्याचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघातील सहकारी एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली. डिव्हिलियर्सने दिलेला एक सल्ला त्याला कायम आठवत राहील, असे हर्षलने सांगितले.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 20 Nov 2021, 3:28 pm
रांची : येथे झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने सहज विजय मिळवला. या सामन्यातून आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पण करणारा हर्षल पटेल सामन्याचा मानकरी ठरला. दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा आपल्यावर खूप प्रभाव असल्याचे हर्षल पटेलने सामन्यानंतर सांगितले. पटेल म्हणाला की, त्याने डिव्हिलियर्सला खूप जवळून पाहिले आहे आणि त्याच्या कारकिर्दीवर एबीने आपली छाप पाडली आली. पटेल आणि डिव्हिलियर्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) या संघातून इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये एकत्र खेळले आहेत. डिव्हिलियर्सने शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम harshal patel recalls valuable advice from ab de villiers which will stay with him throughout career
पदार्पणाच्या सामन्यात हर्षल ठरला हिरो; डिव्हिलियर्सने सांगितलेली 'ती' गोष्ट कधीच विसरणार नाही


वाचा- Video: आउट होण्याची ही कोणती पद्धत; क्रिकेटपटूवर संपूर्ण देश भडकला

एका व्हिडिओमध्ये डिव्हिलियर्सने आरसीबी व्यवस्थापन आणि त्याचा मित्र विराट कोहलीचे आभार मानले आहेत. डिव्हिलियर्सने आरसीबीसाठी १५६ सामने खेळले असून ४४९१ धावा केल्या आहेत. विराट कोहलीनंतर सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज आहे.



वाचा- षटकार मारण्यास गेला आणि बॅट तुटली; पाहा भुवनेश्वरचा घातक चेंडू

एबी डिव्हिलियर्सबद्दल बोलताना पटेल म्हणाला की, जेव्हा आम्ही यूएईमध्ये मोहीम सुरू करत होतो, तेव्हा मी डिव्हिलियर्स विचारले, 'मी आयपीएलमध्ये १२-१५ अगदी २० धावांचे षटकेही टाकली आहेत, मग ती कशी कमी करू? मी एका षटकात कमीत कमी धावा देण्यासाठी काय करू? तेव्हा एबी मला म्हणाला की, 'जेव्हा एखादा फलंदाज तुमच्या चांगल्या चेंडूवर मोठा फटका मारतो, तेव्हा तुम्ही लगेच टप्पा बदलू नका. तुम्ही सतत फलंदाजाला फक्त तुमचा चांगला चेंडू मारायला भाग पाडले पाहिजे. चांगला चेंडू मारल्यानंतर जर तुम्ही त्यात बदल कराल, अशी फलंदाजाची अपेक्षा असते. आयपीएलच्या दुसऱ्या पर्वादरम्यान ही गोष्ट माझ्या मनात कायम आहे आणि माझ्या संपूर्ण कारकिर्दीत माझ्यासोबत राहील.'



वाचा- ६५ वर्षानंतर प्रथमच असे होणार जेव्हा कसोटी संघाचा कर्णधार हा...


यापेक्षा चांगल्या पदार्पणाची अपेक्षा करू शकत नाही
पटेलने पहिल्या टी-२० सामन्यात ४ षटकात २५ धावा देऊन २ बळी घेतले. त्याच्या शानदार गोलंदाजीमुळे त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरवण्यात आले. पहिल्या टी-२० सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जिंकणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. पटेल म्हणाला की, 'यापेक्षा चांगल्या पदार्पणाची अपेक्षा करू शकत नाही. हळूहळू प्रगती होत आहे.

हर्षल पटेलच्या पदार्पणाबद्दल कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, 'हर्षल पटेलने अशी कामगिरी अनेकदा केली आहे. तो अनेक वर्षांपासून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत आहे. सामन्यात काय करायचे आहे, हे त्याला माहीत आहे.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज