अ‍ॅपशहर

Video : 'एकदा मैदानात उतरलो की...'; शार्दुल ठाकूरने उघड केले यशाचे रहस्य

INDvsSA : मुंबईच्या या क्रिकेटपटूने सांगितले की, संघाच्या विजयात नेहमी योगदान देणारा खेळाडू बनणे, हे त्याचे ध्येय आहे. पहिल्या डावात भारताने ३२८ धावांपर्यंत मजल मारली. तर ३० धावांत आफ्रिकेचे ३ खेळाडू माघारी परतले होते.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 28 Dec 2021, 5:38 pm
सेंच्युरियन : भारतीय क्रिकेट संघाचा युवा क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरने आपल्या खेळाच्या जोरावर सर्वांनाच आपली दखल घ्यायला लावली आहे. कसोटी क्रिकेटमध्येही त्याने आपल्या कामगिरीने खूप प्रभावित केले आहे. एक वेगवान गोलंदाज तसेच अष्टपैलू खेळाडू म्हणून शार्दुलने पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया आणि नंतर इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली. आता त्याची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीही संघात निवड झाली आहे. आणि तो यशस्वी होईल, असा विश्वात त्याने व्यक्त केला आहे. शार्दुलने आर. अश्विनसोबतच्या संभाषणात त्याच्या यशाचे रहस्य उलगडले. मैदानावर उतरल्यानंतर आत्मविश्वासच त्याच्यासाठी सर्वस्व असल्याचे त्याने सांगितले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hope i can repeat my success of england and australia in south africa too says shardul thakur
Video : 'एकदा मैदानात उतरलो की...'; शार्दुल ठाकूरने उघड केले यशाचे रहस्य


वाचा- पावसाने मुड ऑफ केला तरी भारताला विजयासाठी संधी; फक्त ही एक गोष्ट करावी लागले

त्याच्या उत्कृष्ट फलंदाजी कौशल्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुपर स्पोर्ट्स पार्कवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ईशांत शर्मा आणि उमेश यादव यांच्यापेक्षा ठाकूरला प्राधान्य दिले आहे. त्याचा संघ सहकारी रविचंद्रन अश्विनशी बोलताना शार्दुलने बीसीसीआय टीव्हीला सांगितले की, “मी या सामन्यात कामगिरी बजावण्यासाठी उत्सुक आहे. मी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये यशस्वी झालो आहे आणि दक्षिण आफ्रिकेतही चांगली कामगिरी करण्याची आशा आहे. दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीमध्ये योगदान दिल्यास मला आनंद होईल.''

वाचा- IND vs SA : रोहित जाणार संघाबाहेर; राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणार विराट कोहली



शार्दुलने भारतासाठी ४३ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६७ बळी घेण्याबरोबरच ३६६ धावा केल्या आहेत. तो म्हणाला की, 'मला गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये माझ्या खेळाचे नियोजन करायला आवडते. जेव्हा मी मैदानावर उतरतो, तेव्हा आत्मविश्वासच माझ्यासाठी सर्वस्व असतो. जेव्हा तुम्ही पांढऱ्या चेंडूवरील क्रिकेट सामना खेळत असता, तेव्हा यॉर्कर्सचा विचार करता. त्यामुळे मी पूर्ण आत्मविश्वासाने यॉर्कर गोलंदाजी करतो, जे एक खेळाडू म्हणून माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.'

महत्वाचे लेख