अ‍ॅपशहर

भारताच्या हातून सामना कसा निसटला, तुफानी फटकेबाजी करणाऱ्या मॅथ्यू वेडने सांगितलं रहस्य

IND vs AUS : भारताने २०८ धावा केल्या, पण तरीही त्यांना सामना गमवावा लागला. ऑस्ट्रेलियाने यावेळी आव्हानाचा असा पाठलाग केला की त्यांनी २०० धावा केल्या असे वाटले नाही. ऑस्ट्रेलियाने यावेळी सामना कसा जिंकला आणि भारतामध्ये खेळताना त्यांनी नेमकं काय ठरवलं आहे, याचे रहस्य आहे तुफानी फटकेबाजी करणाऱ्या मॅथ्यू वेडने सांगितले आहे.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 21 Sep 2022, 10:33 pm
मोहाली : भारताने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात २०८ धावा केल्या, पण तरीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या हातून हा सामंना कसा निसटला आणि ऑस्ट्रेलियाने कसा विजय साकारला, याचे रहस्य आता अखेरच्या सामन्यात तुफानी फटकेबाजी करणाऱ्या मॅथ्यू वेडने सांगितले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ind vs aus
सौजन्य-ट्विटर


ऑस्ट्रेलियाने भारताच्या आव्हानाचा सहजपणे पाठलाग केला. यावेळी ऑस्ट्रेलियाचा संघ २०९ धावांचा पाठलाग करत आहे, असे कधीच वाटले नाही. कारण ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे रहस्य हे एका खास गोष्टीमध्ये आहे आणि ही गोष्ट आता वेडने उलगडली आहे.

वेडने यावेळी सांगितले की, " तुम्ही खेळण्याचा मार्ग रन रेट ठरवतो. आम्ही भारतात खेळतो अशा मैदानात तुम्ही मैदानात कोणत्याही चेंडूवर चौकार मारू शकता. अगदी यॉर्कर चेंडू असला तरी तुम्ही त्याचा सहजपणे सामना करू शकता आणि चौकार व षटकार वसूल करू शकता. पण त्यासाठी एक गोष्ट सर्वात महत्वाची आहे आणि ही गोष्ट म्हणजे तुम्ही शांत राहायला हवे. तुम्ही जेवढे शांत राहाल तेवढी तुम्ही चांगली फटकेबाजी करू शकता. भारतामध्ये धावा करणे ही मोठी गोष्ट नाही कारण खेळपट्टी आणि अन्य गोष्टी फलंदाजांना मदत करत असतात. त्यामुळे भारतामध्ये फलंदाजांनी फक्त डोकं शांत ठेवले तर नक्कीच त्यांना मोठी खेळी साकारता येऊ शकते."

वेडने पुढे सांगितले की, " आम्ही आज ज्या प्रकारे खेळलो आणि सुरुवातीला झटपट धावा केल्या त्यामुळे आम्हाला सामना जिंकण्याची प्रत्येक संधी मिळाली. मोहालीची चांगली विकेट होती आणि तिथे काही दव होते. आउटफिल्डही चांगले होते. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा मार्ग शोधण्यासाठी आमच्या फलंदाजीत चांगली डेप्थ आहे. ग्रीनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच डावाची सुरुवात केली आणि सामना जिंकणारी खेळी खेळली. जेव्हाही मी त्याला खेळताना पाहतो तेव्हा तो मला प्रभावित करतो. काही वर्षांपूर्वी पश्चिम ऑस्ट्रेलियात पाहिला. नवव्या क्रमांकावर फलंदाजी करणारा तो गोलंदाज होता. तो आता कुठे आहे हे पाहिल्यावर ते खूपच उल्लेखनीय वाटते. प्रशिक्षक आणि कर्णधाराला वाटते की टी-२० क्रिकेटमध्ये पाय रोवण्यासाठी ही त्याची सर्वोत्तम जागा आहे."
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख