अ‍ॅपशहर

'या जोडीमुळे ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० वर्ल्डकप भारत जिंकणार'

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्ससाठी पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. या कारणामुळे त्याच्याकडून क्रिकेट चाहत्यांना खूप आशा आहेत. त्याचबरोबर त्याने भारतीय संघाला आशिया कपचे विजेतेपदही मिळवून दिले आहे.

Lipi 9 Nov 2021, 8:37 am
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेनंतर भारतीय संघात अनेक बदल होणार आहेत. या दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने एक वक्तव्य केलं असून सध्या त्याचीच चर्चा होत आहे. भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांची जोडी भारतीय संघाला लवकरच विश्वचषक जिंकून देऊ शकते, असा विश्वास गंभीरने व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम i hope rohit sharma and rahul dravid can win an icc title says gautam gambhir
'या जोडीमुळे ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० वर्ल्डकप भारत जिंकणार'


वाचा-शोएब अख्तरला बसला १० कोटी दणका; Live टीव्ही शोमध्ये केला होता राडा

काही दिवसांपूर्वी राहुल द्रविडची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी-२० विश्वचषकानंतर संपुष्टात येत आहे. त्यामुळे टी-२० विश्वचषकानंतर राहुल द्रविड भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. शास्त्रींप्रमाणेच कर्णधार म्हणून विराट कोहलीची देखील ही शेवटची स्पर्धा आहे. टी-२० विश्वचषकानंतर या फॉरमॅटमधील संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे त्याने आधीच जाहीर केले होते.

वाचा- अफगाणिस्तानच्या पराभवानंतर भारताने घेतला मोठा निर्णय; संघ व्यवस्थापनाने रद्द केला...

विराट कोहलीनंतर संघाची सूत्रे रोहित शर्माच्या हाती जाण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा टी-२० संघाचा कर्णधार होण्याच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आणि राहुल द्रविडची जोडी कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून पाहायला मिळू शकते.

वाचा- IPL का खेळला मग? बीसीसीआयने कोहली अँड कंपनीला फटकारले

रोहित-द्रविडची जोडी चमत्कार घडवणार?
या नव्या जोडीबाबत गौतम गंभीरने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित-द्रविडची जोडी संघासाठी आयसीसी विजेतेपद मिळवू शकते, अशी आशा गंभीरने व्यक्त केली आहे.

वाचा- विराट कोहलीच्या त्या एका चुकीने भारताचा घात झाला; अन्य संघ जिंकत होते आणि...

स्टार स्पोर्ट्सवरील संवादादरम्यान तो म्हणाला की, मला आशा आहे की, रोहित शर्मा आणि राहुल द्रविड भारतीय क्रिकेटला या फॉरमॅटमध्ये पुढे नेतील आणि लवकरच आयसीसी स्पर्धा जिंकतील. ते इंग्लंडचे टेम्प्लेट फॉलो करू शकतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज