अ‍ॅपशहर

फक्त एक मॅच खेळला नाही आणि बुमराहला बसला मोठा झटका; जे कमावले होते तेच...

Jasprit Bumrah: इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहने पहिल्या दोन सामन्यात धमाकेदार कामगिरी केली. पण तिसऱ्या लढती आधी तो दुखापतीमुळे संघाबाहेर झाला.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jul 2022, 4:11 pm
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धच्या ३ सामन्यांची वनडे मालिका जिंकली. या मालिकेतील पहिल्या दोन लढती भारत आणि इंग्लंड संघाने जिंकली होती. अखेरच्या निर्णयाक लढती टीम इंडियाने बाजी मारली आणि मालिका २-१ने जिंकली. त्याआधी टीम इंडियाने टी-२० मालिकेत देखील बाजी मारली होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Jasprit Bumrah og


अखेरच्या वनडेत भारताने संघातील जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली होती. पण या एका सामन्यात त्याला विश्रांती देण्याचा मोठा फटका बसला आहे. इंग्लंडविरुद्धची अखेरची मॅच न खेळल्याने बुमराहला जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान गमवण्याची वेळ आलीय. न्यूझीलंडचा जलद गोलंदाज ट्रेंट बोल्टने त्याच्याकडून अव्वल स्थान काढून घेतले.

वाचा- चहावाल्याच्या लेकीला रौप्य; कोल्हापूरच्या निकिता कमलाकरने देशाला पदक जिंकून दिले

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी वनडेमधील ताजी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत बोल्ट ७०४ गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. बुमराहचे ७०३ गुण असून तो दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये फक्त एका गुणाचा फरक आहे.

बुमराहला इंग्लंडविरुद्धची अखेरची वनडे खेळता आली नाही. त्यावेळी त्याला दुखापत झाली होती. या एका सामन्यात न खेळल्याचा फटका बुमराहला बसला. बोल्टने त्याच्याकडून अव्वल स्थान काढून घेतले. वनडे क्रमवारीत टॉप १० मध्ये एकटा भारतीय गोलंदाज आहे. त्याच्यानंतर युजवेंद्र चहल १६व्या क्रमांकावर आहे.

वाचा- ब्रा हातात घ्या आणि बाहेर निघा...; परीक्षा देणाऱ्या विद्यार्थींनीने सांगितला भयानक अनुभव



बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत धमाकेदार कामगिरी केली होती. त्याने १९ धावात ६ विकेट घेतल्या. यामुळे भारताने १० विकेटनी विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या वनडेत बुमराहने २ विकेट घेतल्या होत्या.

वाचा- शिवसेना कोणाची? कसं, कोण ठरवणार, काय सांगतो...



विराट कोहलीला दणका

फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीला फटका बसलाय. तो तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा रसी वेन डेर दुसेन तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा पाचव्या स्थानावर आहे. फलंदाजांच्या यादीत टॉप-१०मध्ये हे दोनच भारतीय आहेत. त्यानंतर शिखर धवन आहे जो १४व्या क्रमांकावर आहे.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख