अ‍ॅपशहर

CSK च्या खेळाडूचा द हंड्रेडमध्ये जलवा; हॅट्ट्रिकसह घेतल्या ५ विकेट

The Hundred Imran Tahir Hattrick : प्रथम फलंदाजी करताना कर्णधार मोईन अली आणि विल समीद यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर फिनिक्सने 184 धावांचं आव्हान उभं केलं होतं.

Lipi 11 Aug 2021, 12:27 pm
एजबस्टन : दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी लेग स्पिनर इम्रान ताहीरने द हंड्रेडमध्ये आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवला आहे. बर्मिंघम फिनिक्सकडून खेळणाऱ्या 42 वर्षीय ताहिरने वेल्स फायर विरुद्ध हॅटट्रिकसह एकूण 5 विकेट्स घेतल्या. या स्पर्धेत हॅट्ट्रिक घेणारा ताहिर पहिला गोलंदाज ठरला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम imran tahir hattrick for birmingham phoenix against welsh fire in the hundred league watch video
CSK च्या खेळाडूचा द हंड्रेडमध्ये जलवा; हॅट्ट्रिकसह घेतल्या ५ विकेट


वाचा- कट्टर प्रतिस्पर्ध्याच्या समर्थनात उतरला नीरज चोप्रा; होत आहे कौतुक

अनुभवी गोलंदाज असलेल्या ताहिरच्या घातक गोलंदाजीसमोर वेल्स फायरचा संघ 91 धावांत आटोपला गेला. इयान कॉकबेनने वेल्स फायरसाठी सर्वाधिक 32 धावांचे योगदान दिले, तर कर्णधार बेन डकेट 16 धावा करून बाद झाला.

फिनिक्सने केल्या 184 धावा
तत्पूर्वी, बर्मिंघम फिनिक्सने प्रथम फलंदाजी करताना 5 गडी बाद 184 धावा केल्या. फिनिक्सचा कर्णधार मोईन अलीने 59 धावा केल्या, तर विल समीदने नाबाद 65 धावा केल्या.

वाचा- ऑलिम्पिक इतिहासातील एकमेव क्रिकेट मॅच; या देशाने जिंकले होते सुवर्णपदक

ताहिरने अशी घेतली हॅटट्रिक
ताहिरने सलग तीन चेंडूंमध्ये कॅश अहमद, मॅट मिल्नेस आणि डेव्हिड पायने यांना बाद करत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. या स्पर्धेतील सर्वात वयस्कर खेळाडू असणाऱ्या ताहिरने अहमदला समीदकडे झेल देण्यास भाग पाडले. एक धावा करून अहमद बाद झाला. दुसऱ्या चेंडूवर ताहिरने मिलनेसला पायचित बाद केले. मिल्नेसला खातेही उघडता आले नाही.

वाचा- भारताला आणखी एक 'गोल्ड'; अमेरिका आणि ब्राझीलला मागे टाकले


फिनिक्सचा विजय
डेव्हिड पायनेचा त्रिफळा उडवत ताहिरने आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. पायनेही खाते उघडण्यात अपयशी ठरला. ताहिरला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. फिनिक्सने हा सामना 93 धावांनी जिंकला.


महत्वाचे लेख