अ‍ॅपशहर

IND v AUS : अक्षर पटलेच्या फिरकीच्या जाळ्यात कांगारू अडकले, भारताने रचला विजयाचा पाया

ind vs aus : भारताने आरोन फिंचला झटपट बाद केले असले तरी कॅमेरून ग्रीन मात्र भारताच्या गोलंदाजीवर तुटून पडला. ग्रीनने यावेळी भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला आणि फक्त १९ चेंडूंमध्ये त्याने आपले अर्धशतक साकारले. त्याला भुवीने बाद केले. पण अक्षरने त्यानंतर तीन बळी मिळवले आणि सामना भारताच्या बाजूने झुकवला होता.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 25 Sep 2022, 8:43 pm
हैदराबाद : ऑस्ट्रेलियाने धडाकेबाज सुरुवात केली असली तरी अक्षर पटेलने यावेळी अचूक आणि भेदक मारा केला. आपल्या फिरकीच्या तालावर त्याने कांगारूंना चांगलेच नाचवले. त्यामुळेच भारताला यावेळी ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येवर खीळ बसवता आली आणि त्यांनी विजयाचा पाया रचल्याचे यावेळी पाहायला मिळाले. भारताला यावेळी विजयासाठी १८७ धावा कराव्या लागतील.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम axar patel
सौजन्य-ट्विटर


भारताने आरोन फिंचला झटपट बाद केले असले तरी कॅमेरून ग्रीन मात्र भारताच्या गोलंदाजीवर तुटून पडला. ग्रीनने यावेळी भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला आणि फक्त १९ चेंडूंमध्ये त्याने आपले अर्धशतक साकारले. ग्रीन आता शतक झळकावेल, असे वाटत होते. पण यावेळी भुवेनश्वर कुमारने ग्रीनला बाद केले आणि भारताला मोठे यश मिळवून दिले. ग्रीनने यावेळी २१ चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५१ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

ग्रीनच्या गोलंदाजीवर यावेळी ग्लेन मॅक्सवेल धावचीत झाला आणि ऑस्ट्रेलियाला अजून एक मोठा धक्का बसला. पण यावेळी सर्वांचे लक्ष लागून राहिले होते ते मॅथ्यू वेडवर. कारण गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये ग्रीनने धडाकेबाज फटकेबाजी केली होती आणि ऑस्ट्रेलियाची धआवगती चांगलीच वाढवली होती. त्यामुळे यावेळी वेड कशी फलंदाजी करतो, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली होती. पण यावेळी अक्षरने त्याला बाद करत संघाला मोठे यश मिळवून दिले. पण अक्षरने यावेळी आपल्याच गोलंदाजीवर वेडला बाद केले आणि भारताला मोठे यश मिळवून दिले. वेडला यावेळी फक्त एकच धाव करता आली आणि हा ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का होता. वेड बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाची धावगती थोडी मंदावली. पण त्यानंतर डीम डेव्हिड हा ऑस्ट्रेलियाच्या मदतीला धावून आला. कारण डेव्हिडने त्यानंतर दमदार फटकेबाजी केली आणि ऑस्ट्रेलियाची धावगती वाढवण्याचा चांगलाच प्रयत्न केला. टीमने यावेळी धडाकेबाज फटकेबाजी केली आणि संघाची धावसंख्या वाढवली.

भारताकडून यावेळी अक्षर पटेलने भेदक मारा केला आणि सर्वाधिक तीन विकेट्स मिळवले. पण जसप्रीत बुमरा यावेळी चांगलाच महागडा ठरला, त्याने चार षटकांमध्ये ५० धावा दिल्या.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख