अ‍ॅपशहर

धरमशालात पावसाचा खेळ; पहिला टी-२० सामना रद्द

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात होत असलेल्या तीन टी-२० सामन्यांच्या मालकेतील पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द करावा लागला आहे. धरमशाला येथे आज दुपारपासून पावसाचा जोर वाढला होता. मध्येच पावसाने थोडीशी उघडीप घेतली मात्र पाऊस पुन्हा अवतरल्याने पहिल्या सामन्याचा खेळखंडोबा झाला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Sep 2019, 8:19 pm
धरमशाला : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात होत असलेल्या तीन टी-२० सामन्यांच्या मालकेतील पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द करावा लागला आहे. धरमशाला येथे आज दुपारपासून पावसाचा जोर वाढला होता. मध्येच पावसाने थोडीशी उघडीप घेतली मात्र पाऊस पुन्हा अवतरल्याने पहिल्या सामन्याचा खेळखंडोबा झाला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Match-abandoned


बऱ्याच अवधीनंतर येथे होत असलेल्या टी-२० सामन्यासाठी क्रिकेट रसिक फार उत्सुक होते. मात्र, पावसाने ठाण मांडल्याने प्रेक्षकांचा पुरता हिरमोड झाला आहे. धरमशाला येथे गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. शुक्रवारी दोन्ही संघांना मैदानात सरावही करता आला नाही. त्यात आज दुपारी जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पाऊस पूर्णपणे थांबल्यास सामना होईल, अशी आशा होती. धरमशालाच्या मैदानावरील पाण्याचा निचरा करण्यासाठीची यंत्रणा चांगली आहे. त्यामुळे सामनाधिकाऱ्यांनाही किमान पाच-पाच षटकांचा तरी सामना होईल, असे वाटत होते. मात्र थोडीशी उघडीप घेतल्यानंतर पावसाने पुन्हा बरसायला सुरुवात केल्याने सगळ्या आशा संपुष्टात आल्या. हा सामना रद्द करण्यात आल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, मालिकेतील दुसरा सामना मोहाली येथे बुधवारी (१८ सप्टेंबर) खेळवला जाणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज