अ‍ॅपशहर

IND vs AUS: हार्दिकचं उत्तर ऐकलं का? प्रश्न विचारताच म्हणाला, हे एक मोठं गुपित आहे, मी इथे का सांगू…

Hardik Pandya Press Conference: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत हार्दिक पांड्याला काही अशा प्रश्नांचा सामना करावा लागला. त्याच्या या प्रश्नांचे उत्तर ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. हा प्रश्न काय होता आणि त्याचे उत्तर काय होते, जाणून घेऊया...

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Mar 2023, 10:59 am
मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेला आजपासून (१७ मार्च) सुरुवात होत आहे. पहिला सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांमधील ही मालिका एखाद्या मॉक ड्रिलसारखी असणार आहे. आजच्या सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे असेल. दरम्यान, हार्दिक पांड्या एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या कोट्यातील पूर्ण १० षटके टाकणार का हा प्रश्न अनेक दिवसांपासून सर्वांच्या मनात आहे. पत्रकार परिषदेत त्याला याबाबत प्रश्नही विचारण्यात आला. पाहूया त्याने काय उत्तर दिले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Hardik Pandya Press conference before Ind VS Aus 1st ODI


सामन्याच्या एक दिवस आधी मुंबईत हार्दिकची पत्रकार परिषद घेण्यात अली, यामध्ये त्याने सामन्यासंबंधित बऱ्याच प्रश्नांची उत्तरे दिली. या पत्रकार परिषदेत हार्दिक पांड्याला विचारण्यात आले की तो सामन्यात पूर्ण १० षटके टाकणार का? यावर हार्दिक पांड्याने दिलेल्या उत्तराने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हार्दिकने हुशारीने उत्तर दिले - "हे एक मोठे रहस्य आहे. याचे उत्तर मी इथे का देऊ? ऑस्ट्रेलियाला यासाठी तयारी करू द्या."
IND vs AUS: पहिली वनडे होणार की नाही? मुंबईतील मॅचवर संकटाचे ढग; जाणून घ्या सर्व अपडेट
रोहित शर्माच्या जागी पहिल्या वनडे सामन्यात कर्णधारपद भूषवणारा हार्दिक पुढे म्हणाला - सामन्यात कोणतीही परिस्थिती असेल, आम्ही त्यानुसार निर्णय घेऊ. जर मला वाटले की मी गोलंदाजी करू शकतो, तर मी नक्कीच करेन. पत्रकार परिषदेत हार्दिकने सांगितले की, या सामन्यात शुभमन गिल आणि इशान किशन सलामीसाठी उतरतील. या सामन्यात हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाचीही कसोटी लागणार आहे.

हार्दिक पांड्याला या मर्यादित षटकांच्या सामन्यासाठीचा भारताचा भावी कर्णधार म्हणून गणले जात आहे. दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनीही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनंतर म्हटले होते की, हार्दिकला स्वत:ला सिद्ध करायचे असेल तर त्याला ऑस्ट्रेलियावर विजय मिळवावा लागेल. हा सामना त्यांच्यासाठी मोठी कसोटी असेल. तसेच, ते पुढे म्हणाले होते की एकदिवसीय विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त करू शकतो.

श्रेयससोबत हॉटेलमध्ये आहे तरी कोण? या भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीशी जोडलं जातंय नाव
जगातील पहिल्या क्रमांकाची वनडे इंटरनॅशनल टीम इंडिया आणि दुसऱ्या क्रमांकावरील टीम ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही भिडंत पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील दमदार विजयानंतर आता टीम इंडिया या मालिकेच्या पहिल्या सामन्याची सुरुवात विजयाने करण्याचा प्रयत्न करेल.
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख