अ‍ॅपशहर

भारत-ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या सामन्यासाठी कसे असेल पीच, किती होऊ शकतो स्कोअर जाणून घ्या...

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना मोहालीत होणार आहे. यापूर्वी मोहालीचे पीच हे गोलंदाजांसाठी पोषक समजले जायचे. पण कालांतराने खेळपट्टीमध्ये बदल झाला आणि आता या पीचवर चांगल्या धावाही होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे या सामन्याचा पीच रिपोर्ट आणि किती धावा होती याचा अंदाज जाणून घ्या...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 19 Sep 2022, 9:35 pm
मोहाली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना हा मोहाली येथे उद्या, मंगळवारी खेळवण्यात येणार आहे. पण या पहिल्या सामन्यासाठी खेळपट्टी नेमकी कशी असेल आणि या सामन्यात किती स्कोअर होऊ शकतो, याचा अंदाज आता समोर आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम India vs Australia
सौजन्य-ट्विटर


पहिल्या सामन्यासाठी कशी असेल खेळपट्टी, जाणून घ्या...
मोहालीच्या मैदानात आतापर्यंत भारताने बरेच सामने जिंकले आहेत. पण काळानुरुप मोहालीच्या मैदानाची खेळपट्टी बदलली आहे. यापूर्वी मोहालीची खेळपट्टी ही गोलंदाजांसाठी पोषक समजली जायची. पण कालांतराने खेळपट्टीमध्ये बदल झाला आणि आता या खेळपट्टीवर चांगल्या धावाही होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. पण तरीही या खेळपट्टीवर गोलंदाजांना मदत मिळत असते. सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना या खेळपट्टीवर चांगली मदत मिळू शकते. दुसऱ्या डावाच्या सुरुवातीची काही षटकं ही वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे या सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाज लवकर विकेट्स मिळवू शकतात. पण कालांतराने चेंडू जसा जुना होत जाईल, तशी ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना पोषक ठरू शकते.

या सामन्यात किती धावा होऊ शकतात, जाणून घ्या....
मोहालीतील मैदानात धावाही चांगल्या होऊ शकतात. आतापर्यंत मोहलीच्या सामन्यांचा इतिहास पाहिला तर या मैदानात सरासरी १५०च्या वर धावा झालेल्या आहेत. या मैदानातील धावांची सरासरी ही १७७ एवढी आहे. त्यामुळे या सामन्यात चांगल्या धावा होऊ शकतात. त्यामुळे जो संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले, त्यांना किमान १८० पेक्षा जास्त धावा कराव्या लागतील. कारण त्यापेक्षा कमी धावा झाल्या तर त्यांचा पराभव होण्याची जास्त शक्यता आहे. पण हा सामना सुरु होण्यापूर्वी पावसाची शक्यता आहे. पाऊस पडला तर वेगवान गोलंदाजांना वातावरण पोषक असेल आणि त्यामुळे धावा कमी होऊ शकतात.

भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव , हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया संघ :
ॲरॉन फिंच (कर्णधार), स्टीव्हन स्मिथ, टीम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, ॲश्टन अगर, कॅमेरॉन ग्रीन, डॅनियल सॅम्स, शॉन ॲबॉट, जोश इंग्लिस, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, केन रिचर्डसन, ॲडम झाम्पा, नॅथन एलिस.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख