अ‍ॅपशहर

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का, मोहम्मद शमी संघाबाहेर

Mohammed shami : ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका अद्याप सुरुही झाली नाही, पण त्यापूर्वीच भारतााल एक मोठा धक्का बसला आहे. कारण भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आता या मालिकेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शमीला ही एक चांगली संधी देण्यात आली होती. पण शमी आता या मालिकेत का खेळणार नाही, जाणून घ्या कारण...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 18 Sep 2022, 12:43 am
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण या मालिकेतून आता भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा संघाबाहेर गेला आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी शमीची भारताच्या पंधरा सदस्यीय संघात निवड झाली नव्हती. पण त्याला राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले होते. पण आता शमी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार की नाही, याबाबतचा निर्णय बीसीसीआयला घ्यावा लागणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Mohammed shami
सौजन्य-ट्विटर


मोहम्मद शमी हा करोना पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तो आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत खेळू शकणार आहे. क्रिकबझ या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, अनुभवी वेगवान गोलंदाज पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी मोहालीला पोहोचू शकणार नाही. कारण त्याला करोना झाला असून त्यावर त्याला उपचार घ्यावे लागणार आहेत. बीसीसीआयकडून (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तथापि, ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर लगेच खेळल्या जाणार्‍या भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ३२ वर्षीय शमी खेळण्याची दाट शक्यता आहे. शमीला आता विलगीकरणात ठेवण्यात येईल आणि त्याच्यावर उपचार केले जातील. त्यानंतर शमीच्या तीन करोना चाचण्या घेण्यात येतील. या चाचण्यांचा अहवाल जर निगेटीव्ह आला तरच त्याला भारतीय संघाबरोबर खेळता येऊ शकते.

गेल्यावेळी जो युएईमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक झाला होता, तेव्हा शमी खेळला होता. त्यानंतर शमी आतापर्यंत एकही ट्वेन्टी-२० सामान खेळलेला नाही. आयपीएलमध्ये गुजरातच्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. शमीने यंदा झालेल्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली होती आणि संघाच्या जेतेपदामध्ये त्याने मोलाचा वाटा उचलला होता. इंदूर येथे ४ ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या ट्वेन्टी-२० सामन्यानंतर भारतीय संघ ६ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान विश्वचषक होणार आहे.
भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद. शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया संघ :
अॅरॉन फिंच (कर्णधार), स्टीव्हन स्मिथ, टीम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, अॅश्टन अगर, कॅमेरॉन ग्रीन, डॅनियल सॅम्स, शॉन अॅबॉट, जोश इंग्लिस, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, केन रिचर्डसन, अॅडम झाम्पा, नॅथन एलिस
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख