अ‍ॅपशहर

अहमदाबादेत टीम इंडियाचा गेम होण्याचे संकेत, '११ पिच' देऊ शकतात इंदूरसारखा झटका; वाचा इनसाईड स्टोरी

India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. इंदूरमध्ये झालेल्या शेवटच्या सामन्यात भारताचा ९ विकेट्सने दारूण पराभव झाला. आता अहमदाबादमध्ये रोहित शर्माच्या संघासमोर एक वेगळेच आव्हान असणार आहे.

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Mar 2023, 9:48 am
अहमदाबाद: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील अखेरचा आणि निर्णायक सामना ९ मार्चपासून खेळवला जाणार आहे. सध्याच्या घडीला ४ सामन्यांच्या या कसोटी मालिकेत टीम इंडिया सध्या २-१ ने पुढे आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने इंदूरमध्ये जोरदार पुनरागमन केले. फिरकी गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज टिकले नाहीत आणि ऑस्ट्रेलियाने हा सामना ९ विकेटने जिंकला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Pitch Report of Narendra Modi stadium IND vs AUS


भारताने शेवटची कसोटी जिंकल्यास आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील स्थानही निश्चित होईल. पण प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी कशी असेल?
काय? हरमनप्रीतने वाईड बॉलवर घेतला रिव्ह्यू, कॅप्टनच्या डीआरएसने सगळेच आश्चर्यचकित
नरेंद्र मोदी स्टेडियम

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा कसोटी सामना हा अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. या मैदानावर एकूण ११ खेळपट्ट्या आहेत. यामध्ये ६ लाल मातीच्या आणि ५ काळ्या मातीच्या खेळपट्ट्यांचा समावेश आहे. या दोन्हा खेळपट्ट्यांमध्ये खूप अंतर आहे.

वानखेडे आणि चिन्नास्वामी स्टेडियमवर लाल मातीची खेळपट्टी आहे. या प्रकारच्या खेळपट्टीवर रफ पॅच तयार होतात. लाल मातीच्या खेळपट्टीवर भरपूर उसळी असते आणि त्यामुळे फिरकीपटूंना मदत होते. अशा खेळपट्टीवर गोलंदाज नेहमीच खेळात कायम असतात.

तर दुसरीकडे दिल्ली आणि कोलकात्याच्या स्टेडियममध्ये काळ्या मातीची खेळपट्टी आहे. या खेळपट्ट्यांवर फलंदाजांना अधिक मदत होते. येथे कसोटी सुरू होण्याच्या काही दिवस आधी पाणी ओतणे बंद केले जाते, जेणेकरून फिरकीपटूंना टर्न मिळू शकेल. या खेळपट्ट्यांमध्ये एकसमान उसळी आहे. चेंडू जसजसा जुना होतो तसतशी येथे फलंदाजी करणे सोपे होते.

IND vs AUS: स्मिथ की कमिन्स? अहमदाबाद कसोटीत ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद कोणाकडे; समोर आली मोठी अपडेट
सामना कोणत्या खेळपट्टीवर होणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी खेळपट्टी कशा प्रकारची असेल हा सर्वात मोठा प्रश्न आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांना खेळपट्टीसाठी कोणतेही मार्गदर्शन वा सूचना मिळालेली नाही. अहवालानुसार, अहमदाबाद कसोटीसाठीचा ट्रॅक अधिक फलंदाजांसाठी अनुकूल असेल आणि धावा करण्याच्या अधिक संधी असतील. गुजरात क्रिकेट असोसिएशन (GCA) च्या स्रोताने देशांतर्गत हंगामातील स्कोअरचा हवाला देत खेळपट्टी 'सामान्य' असेल असे सांगितले.

२०२१ मध्ये दोन कसोटी सामने झाले

२०२१ मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात दोन कसोटी सामने झाले होते. दोघांनाही फिरकीपटूंची मदत मिळाली होती. भारताने दोन्ही सामने सहज जिंकले होते. त्यानंतर ५ टी-२० सामनेही खेळले गेले. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करत होती. पण गेल्या सामन्यात फलंदाजांनी वर्चस्व गाजवले.
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख