अ‍ॅपशहर

IND vs NZ : कानपूरमध्ये अक्षरचा कहर; चौथ्याच सामन्यात पटकावले दिग्गज गोलंदाजांच्या यादीत स्थान

कानपूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाला कोणतेही यश मिळाले नसले तरी तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत न्यूझीलंडचा डाव हाणून पाडला.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 27 Nov 2021, 4:53 pm
IND vs NZ : कानपूर : सुमारे ९ महिन्यांपूर्वी कसोटी पदार्पण करणाऱ्या डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने प्रतिस्पर्धी संघांच्या खेळाडूंना नामोहरम करून सोडले आहे. इंग्लंडविरुद्ध पदार्पणाच्या मालिकेत विक्रमी ५ विकेट घेणारा अक्षर पटेल न्यूझीलंडसाठी कर्दनकाळ ठरला. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी कानपूर कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फिरकी गोलंदाजासमोर गुडघे टेकले. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजासारख्या दिग्गज फिरकीपटूंसमोर अक्षरने चांगली कामगिरी केली. आणि भारतीय संघाने पुन्हा एकदा सामन्यात कमबॅक केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ind vs nz axar patel takes 5 for against new zealand in 1st inning of kanpur test
IND vs NZ : कानपूरमध्ये अक्षरचा कहर; चौथ्याच सामन्यात पटकावले दिग्गज गोलंदाजांच्या यादीत स्थान


भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांना विकेटसाठी तरसावे लागले, पण तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त पुनरागमन करत न्यूझीलंडला धक्के देण्यास सुरवात केली. अक्षर पटेलने मधल्या फळीला आपल्या जाळ्यात ओढत ५ बळी घेतले. अवघ्या ४ कसोटी सामन्यांमध्ये आपल्या कारकिर्दीला चार चाँद लावले.

लॅथमला शतक झळकावण्यापासून रोखले
अक्षर पटेलने न्यूझीलंडचा सर्वात अनुभवी फलंदाज रॉस टेलरचा पहिला बळी घेतला. यष्टिरक्षक के.एस. भरतकडे झेल देऊन तो माघारी परतला. यानंतर अक्षरने हेन्री निकोल्सला स्वस्तात बाद केले. किवी सलामीवीर टॉम लॅथमच्या रूपात त्याने सर्वात मोठे यश मिळवले. तो ९५ धावा करून बाद झाला. त्यानंतर टॉम ब्लंडेल आणि टिम साऊदी अक्षरचे बळी ठरले. अक्षरने यावेळी पाच विकेट्स मिळवत न्यूझीलंडचे कंबरडे मोडले आणि त्यामुळेच भारताला पहिल्या डावात आघाडी घेता आली.

७ डावात पाचव्यांदा ५ बळी
या वर्षी फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटीत पदार्पण करणाऱ्या अक्षरने कारकिर्दीतील केवळ चौथ्या कसोटीत पाचव्यांदा एका डावात ५ बळी घेतले आहेत. अक्षरने अवघ्या सातव्या डावात पाचव्यांदा हा पराक्रम केला आणि दिग्गज गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले. पाच वेळा सर्वात कमी डावात पाच बळी घेण्याच्या बाबतीत तो चार्ली टर्नर आणि टॉम रिचर्डसन यांच्यासोबत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज रॉडनी हॉगने अवघ्या ६ डावात हा पराक्रम केला आहे.

महत्वाचे लेख