अ‍ॅपशहर

टी-२०: खास विक्रमासाठी धवनला हव्यात फक्त ४४ धावा

भारत-दक्षिण आफ्रिका संघामध्ये आज होणारा दुसरा टी-२० क्रिकेट सामना भारतीय संघातील धडाकेबाज फलंदाज शिखऱ धवनसाठी खास असणार आहे. या सामन्यात शिखर धवनला सात हजारी मनसबदार बनण्याची संधी आहे. त्यासाठी त्याला अवघ्या ४४ धावा हव्या आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Sep 2019, 1:42 pm
नवी दिल्ली: भारत-दक्षिण आफ्रिका संघामध्ये आज होणारा दुसरा टी-२० क्रिकेट सामना भारतीय संघातील धडाकेबाज फलंदाज शिखऱ धवनसाठी खास असणार आहे. या सामन्यात शिखर धवनला सात हजारी मनसबदार बनण्याची संधी आहे. त्यासाठी त्याला अवघ्या ४४ धावा हव्या आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ind vs sa 2nd t20i shikhar dhawan needs 44 runs to complete 7000 t20 runs
टी-२०: खास विक्रमासाठी धवनला हव्यात फक्त ४४ धावा


शिखर धवनने आतापर्यंत स्थानिक व आंतरराष्ट्रीय अशा सर्व स्तरावरील २४६ टी-२० सामन्यांमध्ये ६९५६ धावा कुटल्या आहेत. ३१.९० च्या सरासरीनं त्यानं या धावा केल्या आहेत. यात ५३ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये केलेल्या १३३७ धावांचा समावेश आहे. टी-२० कारकिर्दीत त्यानं एकूण ५३ अर्धशतकं ठोकली आहेत. तर, सर्वाधिक ९७ धावा केल्या आहेत. टी-२० मधील ७ हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला फक्त ४४ धावांची गरज आहे.

मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर आजचा सामना होणार आहे. २०१३ मध्ये याच मैदानावर धवननं कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती. पदार्पणाच्या सामन्यात त्यानं १८७ धावा केल्या होत्या. त्यामुळं सात हजार धावांचा विक्रमही तो याच मैदानावर करेल, अशी आशा चाहत्यांना आहे.

हे आहेत सात हजारी मनसबदार

टी-२० सामन्यांमध्ये आतापर्यंत विराट कोहली, सुरेश रैना आणि रोहित शर्मा यांनी ७ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. विराट हा टी-२०मध्ये सर्वाधिक धावा काढणारा भारतीय फलंदाज आहे. त्यानं २६९ सामन्यांमध्ये ८४७५ धावा केल्या आहेत. तर, सुरेश रैनानं ३१९ सामन्यांमध्ये ८३९२ धावा केल्या आहेत. भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर ८२९१ (३१६ सामने) धावा आहेत.

विश्वविक्रम गेलच्या नावावर

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल याच्या नावावर आहे. गेलनं ३८९ सामन्यांमध्ये ३९.०७ च्या सरासरीनं १३०१३ धावा केल्या आहेत. इतकंच नव्हे, त्याच्या नावावर २२ शतकं व ८० अर्धशतकं आहेत. न्यूझीलंडचा ब्रँडन मॅक्कलम दुसऱ्या स्थानी आहे. त्यानं ३७० सामन्यांमध्ये ९९२२ धावा केल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज