अ‍ॅपशहर

द.आफ्रिकेचा अंदाज चुकला; पुण्याच्या ऋतुराज गायकवाडने दिला दणका, पाहा व्हिडिओ

Ruturaj Gaikwad five boundaries: भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात ४८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात सलामीवीर ऋतुराज गायकवाडने संघाला धमाकेदार सुरुवात करुन दिली.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jun 2022, 10:02 am
विशाखापट्टणम: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेत भारतीय संघाची सलामी जोडी फार चांगली कामगिरी करताना दिसत नव्हती. सलामीच्या फलंदाजांपैकी ईशान किशन धावा करत होता पण ऋतुराज गायकवाड(Ruturaj Gaikwad)ची बॅट चालत नव्हती. त्यामुळेच तिसऱ्या सामन्यात त्याला वगळण्याची मागणी काही चाहते करत होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ruturaj Gaikwad
ऋतुराज गायकवाड


तिसऱ्या (ind vs sa 3rd t20i) लढतीत पुण्याच्या ऋतुराज गायकवाडला देखील कल्पना होती की आता नाही तर कधीच नाही. दबाव असताना कशी फलंदाजी करायची असते याचा अनुभव ऋतुराजकडे चांगलाच आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात २३ तर दुसऱ्या सामन्यात त्याने फक्त १ धाव केली होती. पण तिसऱ्या सामन्यात ऋतुराजने दमदार अर्धशतक झळकावले. ऋतुराजने ३५ चेंडूत ५७ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी-२०मधील त्याचा हे पहिले अर्धशतक ठरले. दोन वेळा अपयशी ठरल्यानंतर ऋतुराजने तिसऱ्यांदा दाखवलेला विश्वास मोडू दिला नाही.

वाचा- गोल्डन बॉय नीरज चोप्राचा नवा विक्रम; आजवर कोणत्याही भारतीय खेळाडूला जमले नाही

द.आफ्रिकेविरुद्ध ऋतुराजने आक्रमक सुरुवात केली. पाचव्या षटकात त्याने एनरिच नॉर्ट्जेच्या एका षटकात सलग पाच षटकार मारले. पहिला चेंडू ऑफ साइटला कट मारून, दुसरा मिड ऑनच्या वरून, तिसऱ्या बाऊंसर चेंडूवर थर्डमॅनला चौकार, चौथ्या चेंडूवर मनगटाचा वापर करून तर पावच्या चेंडूवर शॉर्ट थर्डमॅनच्या दिशने चेंडू सीमारेषेबाहेर पाठवला.


वाचा- कसोटीत टी-२० स्टाइल; बेअरस्टोच्या वादळात उडाला किवी संघ, ५० षटकात इंग्लंडने गाठले डोंगराएवढे लक्ष्य

ऋतुराजच्या या आक्रमक सुरुवातीमुळे भारताने पॉवर प्लेमध्ये विकेट न गमावता ५७ धावा केल्या होत्या. त्याने ३० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. केशव महाराजच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. २ षटकार आणि ७ चौकारांसह त्याने ३५ चेंडूत ५७ धावा केल्या. ईशान किशनने देखील ३५ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. यामुळे भारताने १७९ धावांपर्यंत मजल मारली. उत्तरादाखल द.आफ्रिकेला १३१ धावा करता आल्या. या विजयामुळे भारताचे मालिकेतील आव्हान कायम राहिले आहे.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख