अ‍ॅपशहर

IND vs SA : दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधी

IND vs SA : भारताने जर हा सामना जिंकला तर त्यांना इतिहास रचता येणार आहे. भारतीय संघाला सलग पाचवी टी-२० मालिका जिंकण्याची संधी आहे.भारताला आपल्या देशात आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकही ट्वेन्टी-२० मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे हा सामना जिंकत भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी आहे आणि कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नावावर एक मोठा विक्रम आज होऊ शकतो.​​

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 2 Oct 2022, 6:47 pm
गुवाहाटी : दुसऱ्या ट्वेन्टटी़-२० सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने यावेळी भारताचा संघ जाहीर केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम IND VS SA
सौजन्य-ट्विटर


भारतीय संघ : 1 रोहित शर्मा (कर्णधार), 2 केएल राहुल, 3 विराट कोहली, 4 सूर्यकुमार यादव, 5 ऋषभ पंत (विकेटकीपर), 6 दिनेश कार्तिक, 7 अक्षर पटेल, 8 हर्षल पटेल, 9 आर अश्विन 10 दीपक चहर, 11 अर्शदीप सिंग.

भारतीय संघाने जर दुसरा सामना जिंकला तर त्यांना मालिका जिंकता येणरा आहे. त्यामुळे आता या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल होतील, असे म्हटले जात होते. कारण हा सामना भारताने जिंकला तर त्यांना ट्वेन्टी-२० मालिका खिशात टाकता येणार आहे. त्याचबरोबर भारताला आपल्या मातीत पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका जिंकता येणार आहे. त्यामुळे भारतासाठी हा सामना सर्वात महत्वाचा आहे.

भारतीय संघाला सलग पाचवी टी-२० मालिका जिंकण्याची संधी आहे. गेल्या चार टी-२० मालिकांत भारताने आयर्लंड (२-०), इंग्लंड (२-१), वेस्ट इंडिज (४-१) आणि ऑस्ट्रेलिया (२-१) या संघांना हरवले आहे. त्याबरोबर भारताला आपल्या देशात आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकही ट्वेन्टी-२० मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे हा सामना जिंकत भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी आहे आणि कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नावावर एक मोठा विक्रम आज होऊ शकतो.

गेल्या सामन्यात अश्विनने दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे या सामन्यातही त्यालाच संधी मिळणार, असे दिसत आहे. आर अश्विनने टीम इंडियासाठी आतापर्यंत ५७ टी-२० सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये आर अश्विनने ६.७२ च्या इकॉनॉमीने ६६ विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात आर अश्विनने ४ षटके टाकली आणि फक्त २ च्या इकॉनॉमीने फक्त आठच धावा दिल्या होत्या. आर अश्विनच्या या कामगिरीने चहलचे दडपण वाढले आहे. कारण अश्विनकडे चांगला अनुभव आहे आणि आता तो चांगल्या फॉर्मातही आला आहे. त्यामुळे चहलसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे म्हटले जात आहे. कारण युझवेंद्र चहलचा ऑस्ट्रेलिया मालिकेत ११ खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला होता. या मालिकेत युजवेंद्र चहलने ३ सामन्यात ९.१२ च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आणि त्याला फक्त २ विकेट्स घेता आल्या. त्याचबरोबर आशिया चषक स्पर्धेतही तो संघासाठी डोईजड ठरला होता.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख