अ‍ॅपशहर

सर्वांची नजर भारतीय गोलंदाजावर; टी-२०मध्ये आज होणार महाविक्रम

Bhuvneshwar Kumar News: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा मुख्य जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jun 2022, 4:20 pm
विशाखापट्टनम: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी टी-२० थोड्याच वेळात विशाखापट्टनम येथे सुरू होणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन लढतीत टीम इंडियाचा पराभव झाल्याने ही मॅच कोणत्याही परिस्थितीत जिंकावी लागणार आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला ही मॅच जिंकण्यासाठी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिनही आघाडींवर शानदार कामगिरी करावी लागले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम team india
भारतीय क्रिकेट संघ


तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय चाहत्यांची नजर संघातील जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार याच्यावर राहिल. या सामन्यात भुवीला आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये एक महाविक्रम करण्याची संधी आहे. जर त्याने या लढतीत एक विकेट घेतली तर तो टी-२० क्रिकेटमध्ये पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरले. सध्या भुवी वेस्ट इंडिजचा सॅम्युअल बद्री आणि न्यूझीलंडचा टिम साउदी यांच्यासह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे.

वाचा- कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच असे घडले; एका जलद गोलंदाजाने पाहा काय केले

टी-२०मधील पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक विकेट

सॅम्युअल बद्री- ५० डावात ३३ विकेट
भुवनेश्वर कुमार- ५९ डावात ३३ विकेट
टिम साउदी- ६८ डावात ३३ विकेट
शाकिब अल हसन- ५८ डावात २७ विकेट
जोश हेजलवुड- ३० डावात २६ विकेट

वाचा- सचिन तेंडुलकरला मिळणार ७० हजार पेन्शन; BCCIच्या निर्णयाचा इतक्या जणांना फायदा

द.आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भुवनेश्वर कुमारने शानदार गोलंदाजीकरत ४ विकेट घेतल्या होत्या. भुवीच्या या कामगिरीनंतर देखील भारताचा पराभव झाला होता. आता तिसऱ्या लढतीत देखील त्याच्याकडून अशीच कामगिरी अपेक्षित असेल. भुवीने २०० सामन्यात २६७ विकेट घेतल्या आहेत. त्यापैकी ६३ कसोटी, १४१ वनडेत आणि ६७ टी-२० मधील आहेत.

वाचा- असं कुठवर चालणार; रोहित शर्मा नसेल तर तुम्ही जिंकणार नाही का?
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज