अ‍ॅपशहर

भारतीय संघ झिम्बाब्वेमध्ये दाखल; किती, कधी आणि कुठे सामने होणार जाणून घ्या...

IND v ZIM : या दौऱ्यासाठी शिखर धवनकडे नेतृत्व सोपवण्यात आले होते. पण त्यानंतर काही दिवसांनी लोकेश राहुल हा फिट झाला आणि त्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले. पण राहुलला फक्त संघात स्थान देण्यात आले नाही तर त्याच्याकडे नेतृत्वही सोपवण्यात आले आहे. या दौऱ्यासाठी व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांना प्रशिक्षकपद देण्यात आले आहे.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 15 Aug 2022, 8:07 pm
हरारे : आशियाच चषक स्पर्धा होण्यापूर्वी भारत आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये सामने खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आशिया चषकाची रंगीत तालीम म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाऊ शकते. आज भारतीय संघ झिम्बाब्वेमध्ये दाखल झाला आहे. झिम्बाब्वेमध्ये भारतीय संघ किती सामने खेळणार आहे आणि हे सामने कधी होणार आहेत, याची माहिती आता समोर आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम team india
सौजन्य-बीसीसीआय ट्विटर


भारताचा झिम्बाब्वेचा दौरा हा १८ ऑगस्टपासून (गुरुवार) सुरु होणार आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला वनडे सामना हा १८ ऑगस्टला सुरु होईल. त्यानंतर भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसरा वनडे सामना हा २० ऑगस्टला (शनिवार) खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील तिसरा वनडे सामना हा २४ ऑगस्टला (सोमवारी) खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्यातील हे तिन्ही सामने हरारे येथे खेळवण्यात येणार आहेत. भारतीय संघ या दौऱ्यात फक्त तीन वनडे सामनेच खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे हा दौरा १८ ते २२ ऑगस्ट एवढ्या दिवसांचाच असेल. या दौऱ्यानंतर आशियाच चषकाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या दौऱ्यामधून लोकेश राहुल दीपक हुडा हे दोन खेळाडू झिम्बाब्वेमधून थेट युएईसाठी रवाना होणार आहे, तर बाकीचे खेळाडू हे मायदेशी परतणार आहेत. या दौऱ्यासाठी भारताने कर्णधार आणि प्रशिक्षकही बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा-भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटं कुठे बुक करता येतील, जाणून घ्या लिंक आणि किंमत...

या दौऱ्यासाठी शिखर धवनकडे नेतृत्व सोपवण्यात आले होते. पण त्यानंतर काही दिवसांनी लोकेश राहुल हा फिट झाला आणि त्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले. पण राहुलला फक्त संघात स्थान देण्यात आले नाही तर त्याच्याकडे नेतृत्वही सोपवण्यात आले आहे. त्याचबरोबर या दौऱ्यासाठी राहुल द्रविड हे भारताचे प्रशिक्षक नसतील. या दौऱ्यासाठी भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक आणि माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांना प्रशिक्षकपद देण्यात आले आहे. आशिया चषकासाठी खेळाडू आणि प्रशिक्षक फिट आणि ताजेतवाने असवाते, यासाठी या दौऱ्यातील संघात बरेच बदल करण्यात आले आहे. झिम्बाब्वे दौऱ्यातील राहुल आणि हुडा हे दोन खेळाडू वगळता अन्य खेळाडू हे भारतामध्ये सराव करून थेट युएईला दाखल होतील.

वाचा-कोहली नाही तर रोहित शर्मा मोडू शकतो सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम, आशिया चषकात सुवर्णसंधी

भारतीय संघ : लोकेश राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, ईशान किशन, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख