अ‍ॅपशहर

टीम इंडिया इतिहास घडवणार; वनडेत अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच संघ

IND vs WI 1st ODI :६ फेब्रुवारीला वेस्ट इंडिजविरुद्ध मैदानात उतरताच भारतीय संघ इतिहास रचणार आहे. हा त्याचा 1000 वा एकदिवसीय सामना असेल. असे करणारा तो पहिला संघ ठरेल.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 3 Feb 2022, 1:06 pm
मुंबई : नवीन वर्षात घरच्या मैदानावरील पहिली मालिका खेळण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध ३ सामन्यांच्या एकदिवसीय सामन्यापासून या मालिकेची सुरुवात होणार आहे. ६ फेब्रुवारी रोजी टीम इंडिया या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना खेळेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्यासाठी एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा जेव्हा नाणेफेकसाठी मैदानात उतरेल, तेव्हा भारत आणखी एक इतिहास रचेल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india 1000th odi will be played against west indies set to become first team in the world
टीम इंडिया इतिहास घडवणार; वनडेत अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच संघ


वाचा- Yash Dhull Century: भारत २ बाद ३७; त्यानंतर यशने ऑस्ट्रेलियाला धडा शिकवला

टीम इंडियाचा हा १००० वा एकदिवसीय आहे. यासह हा माईलस्टोन आकडा गाठणारा भारत हा पहिला क्रिकेट संघ ठरेल. भारताने आतापर्यंत ९९९ सामने खेळले असून ५१८ सामने जिंकले आहेत. यादरम्यान टीम इंडियाने ४३१ सामने गमावले, तर ९ सामने बरोबरीत सुटले आहेत. ४१ सामने कोणत्याही निकालाशिवाय संपले.

वाचा- सलग चौथ्यांदा टीम इंडिया ICC वर्ल्डकप फायनलमध्ये; कोणाविरुद्ध, कधी आणि कुठे जाणून घ्या...

भारताची विजयाची टक्केवारी ५४.५४ आहे. या यादीत भारतानंतर ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलियाने ९५८ सामने खेळले आहेत, तर पाकिस्तानने ९३६, श्रीलंकेने ८७० आणि वेस्ट इंडिजने ८३४ सामने खेळले आहेत.

वाचा- डिप्रेशनमध्ये गेलेल्या मुलासाठी वडिलांनी नोकरी सोडली; टीम इंडियाचा नवा स्टार रशीद

दरम्यान, गुजरात क्रिकेट असोसिएशनने म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे तिन्ही सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जातील. दुसरीकडे, पश्चिम बंगाल सरकारने ७५ टक्के प्रेक्षकांना प्रवेश दिला आहे. १६, १८ आणि २० फेब्रुवारी रोजी कोलकाता येथे तीन टी-२० सामने होणार आहेत. त्याआधी अहमदाबादमध्ये ६, ९ आणि ११ फेब्रुवारीला दोन्ही संघांदरम्यान तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत.

एकदिवसीय मालिकेसाठी दोन्ही देशांचे संघ पुढीलप्रमाणे -
भारत -
रोहित शर्मा (कर्णधार), के.एल. राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान

वेस्ट इंडिज -
कायरन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन ऍलन, एन. बोनर, डॅरेन ब्राव्हो, शेमराह ब्रूक्स, जेसन होल्डर, शाई होप, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, केमार रोच, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, हेडन वॉल्श ज्युनियर.

महत्वाचे लेख