अ‍ॅपशहर

भारतीय क्रिकेटपटूविरोधात फतवा; कारण काय तर दसऱ्याला शुभेच्छा देताना रामाचा फोटो...

Mohammad Shami Trolled-टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सोशल मीडियावर दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. यामुळे तो कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर आला. सोशल मीडियावरच, काही वापरकर्त्यांनी त्याच्या ट्विटला धर्माशी जोडून त्याला वाईट तोंडी म्हणण्यास सुरुवात केली

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Oct 2022, 1:15 pm
मुंबई: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. या वर्षी झालेल्या जुलैमध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो दिसला होता. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याची संघात निवड करण्यात आली होती, परंतु करोना विषाणूची लागण झाल्यामुळे तो खेळू शकला नाही. दरम्यान आता त्याच्या एका ट्विटमुळे तो कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर आला होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Mohammad Shami


शमीने दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा

मोहम्मद शमीने सोशल मीडियावर दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आणि यामुळे तो कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर आला आहे. सोशल मीडियावर, काही वापरकर्त्यांनी त्याच्या ट्विटला धर्माशी जोडून त्याच्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात केली. एवढेच नाही तर त्याला नाव बदलण्याचा सल्लाही दिला. मात्र, शमीने त्याकडे लक्ष दिले नाही. शमीच्या या ट्विटला आतापर्यंत ४० हजारांहून अधिक युजर्सनी लाईक केले आहे. त्याला मोठ्या संख्येने लोकांनी पाठिंबा दिला आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या वनडे सामन्याला पावसामुळे होणार उशीर, बीसीसीआय ने दिली

रामाचा फोटो केला पोस्ट

शमीने आपल्या ट्विटमध्ये प्रभू रामाचा फोटोही पोस्ट केला आहे. त्याने लिहिले की, "दसर्‍याच्या या पवित्र सणावर, प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश येवो हीच माझी भगवान रामाकडे प्रार्थना आहे. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा." या ट्विटवरून काही युजर्सनी त्यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली. एका युजरने तर त्याच्या विरोधात फतवा काढला जाऊ शकतो असेही लिहिले. तर दुसर्‍या बाजूला अनेक चाहत्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे.


रोहितसह सर्व स्टार खेळाडू देशाबाहेर; द.आफ्रिकेचा पराभव करण्याची जबाबदारी दिली या

बुमराहच्या जागी अंतिम अकराच्या संघात येण्याची चर्चा

भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पतीच्या दुखापतीमुळे टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे. आशिया कपमधील बुमराहच्या अनुपस्थितीने गोलंदाजी बाजूला बसलेला फटका सर्वांनीच पाहिला. त्यामुळे आता विश्वचषक संघात नसल्याने त्याच्या जागी एका खेळाडूला अंतिम अकराच्या संघात घेणार आहे आणि त्यासाठी मोहम्मद शमीच्या नावाची चर्चा होत आहे. करोनाच्या त्रासातून पुर्णपणे फिट झाल्यास त्याची विश्वचषक संघात निवड करण्यात येईल..

पाकिस्तानमधील टीकाकारांना शांत करण्यासाठी रमीझ राजा दिले विराटचे उदाहरण; पाहा काय

विश्वचषक संघात शमी स्टँडबाय खेळाडू

शमी या वर्षी जुलैमध्ये मँचेस्टरमध्ये शेवटची वनडे मालिका खेळला होता. याआधी तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याचाही भाग होता. गेल्या वर्षीच्या ट्वेंटी-२० विश्वचषकानंतर तो या फॉरमॅटमध्ये भारताकडून एकही सामना खेळलेला नाही. त्याची टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड झाली आहे. शमीने आतापर्यंत ६० कसोटी, ८२ एकदिवसीय आणि १७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख