अ‍ॅपशहर

IND vs NZ: ६० कसोटी मालिकेनंतर इतकी खराब कामगिरी

भारताविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका न्यूझीलंडने २-० अशी जिंकली. ख्राइस्टचर्च येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने तिसऱ्याच दिवशी ७ विकेटनी सामना जिंकला. तर पहिल्या कसोटीत त्यांनी १० विकेटनी विजय मिळवला होता.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Mar 2020, 9:37 am
नवी दिल्ली: भारताविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका न्यूझीलंडने २-० अशी जिंकली. ख्राइस्टचर्च येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने तिसऱ्याच दिवशी ७ विकेटनी सामना जिंकला. तर पहिल्या कसोटीत त्यांनी १० विकेटनी विजय मिळवला होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम virat


दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दिलेल्या १३२ धावांचा पाठलाग न्यूझीलंडने ३६ व्या षटकात पार केला.

कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. सर्वाधिक निराशा केली कर्णधार विराट कोहली याने. विराटने फक्त ३८ धावा केल्या. धक्कादायक म्हणजे विराट पेक्षा अधिक धावा जलद गोलंदाज मोहम्मद शमीने केल्या. त्याने मालिकेत ४४ धावा केल्या आणि ५ विकेट देखील घेतल्या. या मालिकेत विराटची सरासरी ९.५० इतकी होती. जी त्याच्या करिअरमधील दुसऱ्या क्रमांकाची खराब सरासरी ठरली.

न्यूझीलंडविरुद्ध भारतीय फलंदाजांनी सर्वात खराब कामगिरी केली. या मालिकेत भारतीय संघाकडून एकाही फलंदाजाला शतक करता आले नाही. एखाद्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजांनी शतक न करण्याची वेळ २००२-०३ नंतर प्रथमच झाले आहे. त्यानंतर भारताने ६० कसोटी मालिका खेळल्या आहेत आणि त्या प्रत्येक मालिकेत किमान एक तरी शतक झाले होते.

भारतीय संघाच्या पराभवाला फक्त फलंदाजांना जबाबदार ठरवता येणार नाही. मालिकेत गोलंदाजी देखील प्रभावी कामगिरी करताना दिसले नाहीत. सामना जिंकण्यासाठी २० विकेट घेण्याची गरज असते. पण भारतीय गोलंदाजांना ते जमले नाही. जलद गोलंदाजांना अनुकुल असलेल्या वातावरणात ४० पैकी फक्त १८ विकेट घेता आल्या. या उटल न्यूझीलंडच्या जलद गोलंदाजांनी ३८ विकेट घेतल्या.

मालिकेत भारताकडून एका डावात सर्वाधिक धावा मयांक अग्रवालने केल्या. त्याने पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात ५८ धावा केल्या. दिग्गज फलंदाज असलेल्या भारतीय संघातील एकाही फलंदाजाला शतकाच्या जवळ देखील पोहोचता आले नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज