अ‍ॅपशहर

वनडे मालिकेआधी न्यूझीलंड बॅकफूटवर; कर्णधार बदलावा लागला!

भारतीय संघाचा सलामीवीर आणि वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्माला दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे. भारतीय संघासाठी रोहितची दुखापत मोठा धक्का ठरला आहे. पण आता यजमान न्यूझीलंड संघाला देखील असाच मोठा धक्का बसला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Feb 2020, 11:41 am
वेलिंग्टन: भारतीय संघाचा सलामीवीर आणि वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्माला दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे तो वनडे आणि कसोटी मालिका खेळू शकणार नाही. भारतीय संघासाठी रोहितची दुखापत मोठा धक्का ठरला आहे. पण आता यजमान न्यूझीलंड संघाला देखील असाच मोठा धक्का बसला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Kane Williamson


वाचा- भारतीय संघाची घोषणा; रोहितच्या जागी मयांक आणि शुभमनची निवड!

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार आहे. टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात केनच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो चौथ्या आणि पाचव्या सामन्यात खेळू शकला नाही. आता वनडे मालिकेता देखील तो मुकणार आहे. या संदर्भातील माहिती न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिली आहे. केनच्या दुखापतीमुळे न्यूझीलंड वनडे मालिकेआधीच बॅकफूटवर गेली आहे.

वाचा- भारत आणि फायनलमध्ये पाकिस्तान; जाणून घ्या रेकॉर्ड


टी-२० मालिकेत केनच्या अनुउपस्थितीत टिम साऊदीने कर्णधापद सांभाळले होते. आता वनडे मालिकेसाठी टॉम लॅथम यांच्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. टॉम हॅमिल्टन आणि ऑकलंड येथे होणाऱ्या पहिल्या दोन सामन्यांसाठी कर्णधार असेल. केन दुखापतीमधून बाहेर पडला तर तिसऱ्या सामन्यासाठी त्याचा विचार केला जाऊ शकतो, असे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे.

वाचा- सचिनची ताडोबा भेट; शेअर केला अविस्मरणीय व्हिडिओ!

भारतीय संघाने टी-२० मालिकेत न्यूझीलंडला व्हॉइट वॉश दिला होता. त्यामुळे यजमान संघासाठी वनडे मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. पण केनच्या दुखापतीमुळे न्यूझीलंड संघासमोरचे संकट आणखी वाढले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज