अ‍ॅपशहर

अरेच्चा! रांची कसोटीत नाणेफेक करायला तीन कर्णधार

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची तिसरा कसोटी सामना आजपासून रांचीत सुरू झाला. या सामन्याच्या नाणेफेकीच्या वेळी मात्र वेगळेच चित्र दिसले. नाणेफेक करण्यासाठी दोन नव्हे तर तीन खेळाडू उपस्थित होते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Oct 2019, 11:10 am
रांची: भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची तिसरा कसोटी सामना आजपासून रांचीत सुरू झाला. या सामन्याच्या नाणेफेकीच्या वेळी मात्र वेगळेच चित्र दिसले. नाणेफेक करण्यासाठी दोन नव्हे तर तीन खेळाडू उपस्थित होते. दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि बावुमा हे नाणेफेक करण्यास आले होते. तरीही नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ind-v-sa-toss


दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिस हा आशियातील सलग नऊ कसोटी सामन्यात नाणेफेक हरला आहे. त्यामुळेच तो आजच्या सामन्यात नाणेफेकीसाठी बावुमासोबत मैदानात उतरला. मात्र, याचा काहीही फायदा दक्षिण आफ्रिकेच्या संघाला झाला नाही. सलग दहाव्या सामन्यात फाफ डू प्लेसिसने नाणेफेक हरली. याआधीदेखील फाफ डूने ही कल्पना वापरली होती.



प्लेसिसच्या ऐवजी टॉससाठी आला ड्युमनी

मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात एक आंतरराष्ट्रीय टी-२० सामना झाला होता. त्यावेळी फाफ डू प्लेसिसच्या ऐवजी नाणेफेक करण्यासाठी जे. पी. ड्युमनी मैदानावर उतरला होता. विशेष म्हणजे या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये ड्युमनीचा समावेश नव्हता.

IND x SA: कसोटी सामन्याचे Live स्कोअरकार्ड

महिला क्रिकेट सामन्यातही वापरली ही आयडिया

सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघा दरम्यान टी-२० सामना खेळवण्यात आला होता. सिडनीतील हा सामना तीन कर्णधार असलेला म्हणून त्यावेळी प्रसिद्ध झाला होता. यादीवर ऑस्ट्रेलियाची कर्णधार म्हणून मेग लेनिंगचे नाव होते. तर, नाणेफेकीसाठी 'टॉस कॅप्टन' एलिसा हिली मैदानात उतरली. त्यामुळे मैदानात तीन कर्णधार उपस्थित होते.

'विराट' लक्ष्य! कसोटी क्रमवारीत कोहली अव्वल स्थानी झेप घेणार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज