अ‍ॅपशहर

रोहितचा एका हाताने झेल, दिग्गजही अवाक्

देशाच्या इतिहासातील पहिल्या डे नाईट कसोटीत भारताने आक्रमक सुरुवात करत पाहुण्या बांगलादेशची दैना केली आहे. पण यामध्ये क्षेत्ररक्षण करत असलेला रोहित शर्मानेही दिग्गजांचं लक्ष वेधून घेतलं. स्लीपला उभ्या असलेल्या रोहित शर्माने एका हाताने घेतलेला झेल पाहून प्रत्येक जण अवाक् झाला. रोहित शर्माच्या या अप्रतिम झेलमुळे बांगलादेशचा कर्णधार मोमिनुल हकला माघारी परतावं लागलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Nov 2019, 4:38 pm
कोलकाता : देशाच्या इतिहासातील पहिल्या डे नाईट कसोटीत भारताने आक्रमक सुरुवात करत पाहुण्या बांगलादेशची दैना केली आहे. पण यामध्ये क्षेत्ररक्षण करत असलेला रोहित शर्मानेही दिग्गजांचं लक्ष वेधून घेतलं. स्लीपला उभ्या असलेल्या रोहित शर्माने एका हाताने घेतलेला झेल पाहून प्रत्येक जण अवाक् झाला. रोहित शर्माच्या या अप्रतिम झेलमुळे बांगलादेशचा कर्णधार मोमिनुल हकला माघारी परतावं लागलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rohit sharma catch


Live: भारत x बांगलादेश कसोटीचं स्कोअरकार्ड

संकटात सापडलेल्या बांगलादेशला सावरण्यासाठी फलंदाजीसाठी समोर मोमिनुल हक उभा होता. ११ व्या षटकात विदर्भ एक्स्प्रेस उमेश यादवने पुन्हा एकदा भेदक गोलंदाजीचा प्रहार केला. चेंडू बॅटला लागला आणि स्लीपला उभ्या असलेल्या रोहित शर्माने हा चेंडू पकडण्यात कोणतीही चूक केली नाही. रोहित शर्माने एका हाताने घेतलेला झेल पाहून शेजारी खेळाडूही चक्रावले.

ऐतिहासिक कसोटीत बांगलादेश संकटात

ईडन गार्डन्समध्ये कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना पिंक बॉलने खेळवला जात आहे. देशात डे-नाईट कसोटीची ही पहिलीच वेळ आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फलंदाजांनी चुकीचा ठरवला. ३० व्या षटकापर्यंतच बांगलादेशचे ९ फलंदाज १०५ धावात माघारी परतले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज