अ‍ॅपशहर

IND vs NZ 1st Test Day One Highlights : पदार्पणाच्या सामन्यात श्रेयसने गाजवले, जडेजासोबत शतकी भागिदारी

IND vs NZ 1st Test Day One Live: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Nov 2021, 7:39 pm
कानपूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीला कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ४ बाद २५८ धावा केल्या आहेत. संघाची अवस्था ४ बाद १४५ अशी असताना श्रेयस अय्यर आणि रविंद्र जडेजा यांनी नाबाद शतकी भगिदारी करून संघाला चांगल्या स्थितीत पोहोचवले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम भारत विरुद्ध न्यूझीलंड
भारत विरुद्ध न्यूझीलं, पहिली कसोटी



भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या दिवसाचे अपडेट (india vs new zealand 1st test)
>> पहिल्या दिवसाचा खेळ संपला- भारताच्या ४ बाद २५८ धावा, श्रेयस नाबाद ७५ तर जडेजा नाबाद ५०

>> रविंद्र जडेजाचे अर्धशतक पूर्ण

>> श्रेयस आणि जडेजा यांची शतकी भागिदारी पूर्ण

वाचा- INDvsNZ : राहुल द्रविडने टीम इंडियात पुन्हा सुरू केली जुनी परंपरा; पाहा व्हिडिओ

>> भारताने २०० धावांचा टप्पा पार केला

>> पदार्पणाच्या सामन्यात श्रेयस अय्यरचे अर्धशतक

>> भारताच्या १५० धावा; श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा मैदानात

>> अजिंक्य रहाणे ३५ धावांवर बाद, भारत ४ बाद १४५

>> टीम इंडियाला मोठा धक्का, उपकर्णधार पुजारा २६ धावांवर माघारी परतला; भारत ३ बाद १०६

>>भारताचे शतक पूर्ण

>>लंचनंतर भारताला दुसरा धक्का, शुभमन ५२ धावांवर बाद; भारत २ बाद ८२

>> लंच ब्रेक- भारताने २९ षटकात २ बाद ८२ धावा केल्या (गिल-५२, पुजारा-१५)

>> शुभमनच्या ८१ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकारासह ५० धावा

>> शुभमन गिलचे अर्धशतक, कसोटीमधील चौथे अर्धशतक

>> भारताचे अर्धशतक, गिल-पुजारा जोडी मैदानात

>> भारत १ बाद २१

>> भारताला पहिला धक्का, सलमीवीर मयांक अग्रवाल १३ धावांवर बाद

>> भारताच्या पहिल्या डावाला सुरूवात-शुभमन गिल आणि मयांक अग्रवला मैदानात

अशी आहे टीम इंडिया-


>> श्रेयस अय्यर कसोटीत पदार्पण करणार


>> भारताने टॉस जिंकला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

महत्वाचे लेख