अ‍ॅपशहर

टीम इंडियाला झटका? इशांत शर्मा दुसऱ्या कसोटीला मुकणार!

न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची काळजी वाढली आहे. भारताचा जलद गोलंदाज इशांत शर्मा या सामन्यात खेळणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. इशांतला दुखापत झाली असून तो शुक्रवारी सराव सत्रात भाग घेऊ शकला नाही.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Feb 2020, 2:32 pm
ख्राइस्टचर्च: न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची काळजी वाढली आहे. भारताचा जलद गोलंदाज इशांत शर्मा या सामन्यात खेळणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. इशांतला दुखापत झाली असून तो शुक्रवारी सराव सत्रात भाग घेऊ शकला नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ishant sharma


वाचा- दुसऱ्या कसोटीत इशांत शर्माला त्रिशतक करण्याची संधी!

पहिल्या कसोटी सामन्यात इशांतने ६८ धावा देत ५ विकेट घेतल्या होत्या. या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी सारख्या गोलंदाजांना फार यश मिळाले नव्हते आणि भारताचा १० विकेटनी पराभव झाला.

वाचा- इतकी दगदग होत असेल तर IPL खेळू नका!

इशांत जर दुसऱ्या सामन्याला मुकला तर भारतीय संघासाठी तो मोठा झटका असले. टीम इंडिया मालिकेत १-०ने पिछाडीवर आहे. मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत दुसरा सामना जिंकावा लागेल. यासाठी इशांत संघात असणे गरजेचे आहे. इशांतच्या उजव्या गुढघ्याला दुखापत झाली आहे. अद्याप त्याचा वैद्यकीय अहवाल आलेला नाही. जर इशांत कसोटी खेळू शकला नाही तर त्याच्या जागी उमेश यादव किंवा नवदीप सैनी या दोघांपैकी एकाचा संघात समावेश होऊ शकतो. उमेशकडे ४५ कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे.

वाचा- सचिन म्हणाला, तुला खेळताना पाहून छान वाटते!

रणजी सामन्यात दुखापत झाल्याने इशांत संघाबाहेर होता. त्यानंतर तो पहिल्या कसोटीत संघात आला.

हे देखील वाचा-
सचिनने शेअर केला १० महिन्यांच्या मुलाचा फोटो
प्रसिद्ध फुटबॉलपटू पॉन स्टारला पाठवतोय मेसेज

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज