अ‍ॅपशहर

राष्ट्रगीताआधी केएल राहुलने पाहा काय केले; प्रत्येक भारतीय करतोय कौतुक

KL Rahul Ishan Kishan-भारत विरुद्ध झिम्बाब्वे मालिकेत भारताने झिम्बाब्वेच्या संघाला १० विकेट्सने पराभूत केले. हा सामना सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीतादरम्यान केएल राहुल आणि ईशान किशन यांच्यासोबत काही घटना घडल्या आहेत, त्यामुळे चर्चेचा विषय ठरले आहेत.

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Aug 2022, 1:53 pm
हरारे: भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची वन डे मालिका १८ ऑगस्ट रोजी सुरू झाली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने अगदी सहजपणे झिम्बाब्वेवर १० विकेट्सने विजय मिळवला. दीपक चहर, अक्षर पटेल आणि प्रसिद्ध कृष्णा हे गोलंदाज पहिल्या सामन्याचे हीरो ठरले. त्याचवेळी सलामी जोडीमधील शिखर धवनने फलंदाजीत ८१ धावा केल्या आणि शुभमन गिलने ८२ धावांची नाबाद खेळी केली. कर्णधार म्हणून केएल राहुलचा हा पहिला विजय होता. या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर राहुलच्या नेतृत्वाखाली एक कसोटी आणि तीन वन डे सामने टीम इंडियाने गमावले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम KL Rahul


पहिल्या सामन्यात राष्ट्रगीतादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुल आणि इशान किशन यांच्यासोबत अशा काही घटना घडल्या, ज्यामुळे ते चर्चेमध्ये आले. राहुलने असं काही केलं की लोक त्याचे चाहते झाले आहेत. राष्ट्रगीतादरम्यान यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनसोबत अशी घटना घडली, ज्यामुळे सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू झाली.

IND vs ZIM:"शाळा गेली खड्ड्यात, मी मॅच बघायला येणार", झिम्बाब्वेच्या छोट्याश्या फॅनने राहुलला दिले उत्तर

कर्णधार केएल राहुलने काय केले?

झिम्बाब्वेविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी रांगेत उभे होते. दरम्यान, पहिले झिम्बाब्वेचे राष्ट्रगीत सुरू झाले. यादरम्यान केएल राहुल च्युइंगम खाताना दिसला. त्यानंतर राहुलने भारतीय राष्ट्रगीतापूर्वी च्युइंगम बाहेर काढून फेकून दिले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल झाला. यावर लोकांनी केएल राहुलचे जोरदार कौतुक केले आणि आम्हाला राहुलचा अभिमान असल्याचे म्हटले.

कोण आहेत संदीप थोरात? विनोद कांबळीला फायनान्स कंपनीत दिली महिना १ लाख पगाराची ऑफर

ईशान किशन सोबत पाहा काय झालं

त्याचवेळी राष्ट्रगीत सुरू असताना इशान किशनसोबत दुसरी घटना घडली. भारतीय राष्ट्रगीत सुरू असताना इशान किशनवर मधमाशीने हल्ला केला. इशानही हा हल्ला टाळताना दिसला. तो त्याच्या जागेवरून हलला नाही तरी त्याने फक्त मान हलवली. मधमाशी गेल्यानंतर ईशानने आजूबाजूला पाहिले आणि मग राष्ट्रगीतावर लक्ष केंद्रीत केले.

इशान किशनसोबत घडलेली ही घटनाही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यावर 'अशी घटना कोणासोबत घडली आहे', असा प्रश्न विचारत काही जणांनी हा व्हिडीओ शेयर केला आहे.
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख