अ‍ॅपशहर

मोदींच्या 'आत्मनिर्भर भारत'वर रवी शास्त्रींची कमेंट, म्हणाले...

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोदींच्या आत्मनिर्भर भारत, या वक्तव्यावर एक कमेंट केली आहे. मोदी यांच्याबाबतही शास्त्री यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले. त्याचबरोबर देशवासियांना आता नेमके काय करायला हवे, याबाबतही सांगितले. त्यामुळे शास्त्री यांची ही कमेंट आता चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 May 2020, 3:54 pm
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित केले. मोदी यांनी देशाला संबोधित करणार आत्मनिर्भर होण्यावर भर दिला. मोदींच्या आत्मनिर्भर या वक्तव्यावर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक कमेंट केलेली पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ravi shastri


भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. स्वावलंबी भारताची ही भव्य इमारत पाच खांबांवर आधारीत असेल, असंही त्यांनी आपल्या संबोधनात म्हटले. मोदी यांच्या कालच्या संबोधनावर शास्त्री यांनी एक कमेंट केली आहे. मोदी यांच्याबाबतही शास्त्री यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले. त्याचबरोबर देशवासियांना आता नेमके काय करायला हवे, याबाबतही सांगितले. त्यामुळे शास्त्री यांची ही कमेंट आता चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.


शास्त्री यांनी मोदीच्या भाषणाबाबत आपले मत व्यक्त केले आहे. शास्त्री यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये शास्त्री यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. यावेळी शास्त्री म्हणाले की, " मोदी हे शांत आणि दमदारपणे सर्वांसमोर आले. मोदी यांनी भारताने स्वावलंबी म्हणावे असे म्हटले आणि अचूक वक्तव्य त्यांनी केले. ही गोष्ट करणे कठिण आहे. पण आता आपण स्मार्ट बनायला हवे. तुमच्याकडे खंबीर नेतृत्व करणारे मोदी यांच्यासारखे नेते आहेत. त्यामुळे 'एक भारत' या रुपात आपण सर्वांनी एकत्र येऊया."


आगामी लॉकडाऊन हे आतापेक्षा वेगळे असेल. त्यामध्ये चार नवीन गोष्टी पाहायला मिळतील, असेही मोदी यांनी सांगितले. या निर्णयाचे स्वागत सीएसकेने केले आहे. याबाबत सीएसकेने एक ट्विट केले आहे. याट्विटच्या माध्यमातून त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. आगामी लॉकडाऊनचे आपण हसतमुखाने स्वागत करायला हवे, असे सीएसकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. भारताची महिल कुस्तीपटू आणि भाजपाची नेता बबिता फोगटनेही मोदी यांच्या भाषणावर भाष्य केले होते. मोदी यांनी अखेरच्या चेंडूवर षटकार खेचला आहे, असे म्हणत बबिताने मोदी यांची स्तुती केली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज