अ‍ॅपशहर

'...तर भारतीय क्रिकेटचा कणा मोडेल'; रवी शास्त्रींनी BCCIवर तोफ डागली

Ranji Trophy रणजी करंडक ही भारतीय क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाची देशांतर्गत स्पर्धा मानली जाते. रणजी करंडक या स्पर्धेने टीम इंडियाला अनेक दिग्गज खेळाडू दिले आहेत.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 28 Jan 2022, 4:04 pm
मुंबई : यंदा रणजी ट्रॉफी कधी सुरू होणार याबाबतची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, पण भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या प्रकरणी नाराजी दर्शवली आहे. रवी शास्त्री यांनी रणजी ट्रॉफी सुरू न केल्याबद्दल सोशल मीडियातून आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. 'या स्पर्धेकडे दुर्लक्ष केल्यास भारतीय क्रिकेटचा कणा मोडेल,' असे शास्त्रींनी म्हटले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indian cricket will be spineless if ranji trophy is ignored says ravi shastri
'...तर भारतीय क्रिकेटचा कणा मोडेल'; रवी शास्त्रींनी BCCIवर तोफ डागली


रवी शास्त्री यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'रणजी करंडक हा भारतीय क्रिकेटचा कणा आहे. ज्या क्षणी तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करायला लागाल, तेव्हा आपले क्रिकेट कणाहीन होईल.'

वाचा- मेगा ऑक्शनसाठी या संघाने प्लॉन सुरू; मास्टर माइड खेळाडू पोहोचला

रणजी ट्रॉफी या महिन्यात १३ जानेवारीपासून सुरू होणार होती, पण कोरोना विषाणूमुळे त्याला आता विलंब होत आहे. स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. देशांतर्गत हंगाम सुरू करण्यासाठी बीसीसीआयने राज्य संघटनांसोबत बैठका घेतल्या असल्या, तरी ही स्पर्धा कधी सुरू होणार याबाबत निर्णय झालेला नाही.

वाचा- वेस्ट इंडिजविरुद्ध रोहित शर्मा इतिहास घडवणार; या दिग्गज खेळाडूला मागे...


वाचा- IPL 2022साठी बीसीसीआयचा मोठा निर्णय; सर्व सामने या शहरात होणार

दरम्यान, बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी सांगितले की, रणजी करंडक दोन टप्प्यात आयोजित करण्याच्या योजनेवर बोर्ड काम करत आहे. फेब्रुवारीमध्ये एक टप्पा पार पडल्यानंतर आयपीएल आणि त्यानंतर रणजी ट्रॉफीचा उर्वरित हंगाम आयोजित करण्यात यावा, असे विचाराधीन आहे. या बैठकीला बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह उपस्थित होते.

वाचा- युवा खेळाडूंना 'चुना' लावणारी निवड समिती; देवदत्त, ऋतुराज आणि आता वेंकटेशची झाली...

स्पर्धेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत कधीच या स्पर्धेच्या आयोजनात खंड पडला नव्हता, पण कोरोना विषाणूमुळे गेल्या दोन वर्षांपासून ती आयोजित होऊ शकली नाही. अशा स्थितीत या स्पर्धेला खूप महत्त्व आले आहे, असे म्हणता येईल. आता यावर बीसीसीआय काय निर्णय घेते हे पाहायचे आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज