अ‍ॅपशहर

तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर; टीममध्ये मोठे बदल, पाहा कोणाला संधी मिळाली...

ind vs sa 3rd t 20 : भारताचा आज तिसरा ट्वेन्टी-२० सामना आहे. विराट कोहली व लोकेश राहुल या सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर भारताने मालिका जिंकली असून या सामन्यात आता बरेच बदल होऊ शकतात, अशी चर्चा होती. त्यामुळे या तिसऱ्या आणि मालिकेतील अखेरच्या लढतीसाठी कोणाला संधी मिळाली, जाणून घ्या....

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 4 Oct 2022, 6:34 pm
इंदूर : तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारातने टॉस जिंकला. रोहित शर्माने टॉस जिंकत यावेळी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितने यावेळी भारताच्या संघात तीन मोठे बदल करण्याच ठरवले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ind vs sa
सौजन्य-ट्विटर


भारताच्या संघातून यावेळी अर्शदीप सिंगला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर विराट कोहली आणि लोकेश राहुल यावेळी संघात नसतील. त्यामुळे या संघात आता मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर आणि उमेश यादव यांना संधी देण्यात आली आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये इंदूरमध्ये तिसरा ट्वेन्टी-२० सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारतीय संघ एक मोठी गोष्ट करणार असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाला १९वे षटक नेमके कोण टाकणार, याची चिंता सतावत होती. पण ही चिंता आता मिटलेली आहे.

भारताने जेव्हा दुसरा ट्वेन्टी-२० सामना जिंकला होता, तेव्हाच त्यांनी मालिका जिंकली होती. पण आता या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताने २०० धावांचा पल्ला गाठला होता. पण भारताच्या गोलंदाजांनाही चांगलाच मार पडला होता. पण त्यामध्ये एक गोलंदाज असा होता की ज्याने जास्त धावा दिल्या नव्हत्या आणि तो गोलंदाज आहे दीपक चहर. कारण गेल्या सामन्यात दीपकने चार षटकांमध्ये फक्त २४ धावा दिल्या होत्या. प्रत्येक षटकामध्ये त्याने टिचून मारा केला होता. त्यामुळे डेथ ओव्हर्समध्येही तो यशस्वी ठरला होता. त्यामुळे आता डेथ ओव्हर्समधील हे १९वे षटक टाकण्याची जबाबदारी आता दीपकला देण्यात येऊ शकते. कारण दीपक हा चांगला स्विंग गोलंदाज आहे आणि त्याच्या गोलंदाजीची दिशा व टप्पे योग्य असतात. त्यामुळे आता भारतासाठी जे १९वे षटक डोकेदुखी ठरले होते, त्यासाठी आता दीपक चहरसारखा एक चांगला पर्याय भारतीय संघासाठी उपलब्ध झाला आहे.

टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिकेत क्लीन स्वीप मिळवायचा आहे. सूर्यकुमार यादवच्या स्फोटक खेळीच्या जोरावर भारतीय बॅटिंग युनिटने गेल्या दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. गेल्या सामन्यात गोलंदाज चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले. या मालिकेचा निर्णय आधीच झाला आहे. परंतु २०२२ च्या टी२० विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांसाठी हा शेवटचा टी-२० सामना असेल. या अर्थाने, मालिका आनंदात संपावी यासाठी दोन्ही बाजूंनी सर्वतोपरी प्रयत्न करायचे आहेत. श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज हे असे दोन खेळाडू आहेत जे त्यांच्या संधीसाठी उत्सुक असतील. केएल राहुल आणि विराट कोहलीला विश्रांती दिली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारताचा संभाव्य संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर अश्विन, हर्षल पटेल, दीपक चहर आणि मोहम्मद सिराज
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज