अ‍ॅपशहर

DRSसाठी 'या' खेळाडूची मदत घ्या; सुनील गावस्कर यांचा टीम इंडियाला सल्ला

INDvsENG : भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सच्या मैदानावर दुसरा कसोटी सामना खेळत आहे. या दरम्यान भारतीय संघाला डीआरएसमध्ये फारसं यश मिळताना दिसत नाहीय.

Lipi 15 Aug 2021, 7:50 pm
लंडन : भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडसोबत लॉर्ड्सच्या मैदानात दुसरा कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात भारताची फलंदाजी आणि गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली आहे, पण भारतीय संघ एका गोष्टीत पिछाडीवर पडल्याचे सिद्ध होत आहे. आतापर्यंत विराट कोहलीचा संघ 'डीआरएस'मध्ये अपयशी ठरल्याचे दिसते. भारताने दुसऱ्या दिवशी दोन रिव्ह्यू गमावले. मोहम्मद सिराजने कोहलीला दोन वेळा रिव्ह्यू घेण्यास सांगितले, पण तो यशस्वी झाला नाही. या पार्श्वभूमीवर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी एका खेळाडूचे नाव सुचवले आहे, जो टीम इंडियासाठी रिव्ह्यू घ्यायचा की नाही, यासाठी मदत करू शकेल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indvseng sunil gavaskar says rishabh pant should call for drs in indian team
DRSसाठी 'या' खेळाडूची मदत घ्या; सुनील गावस्कर यांचा टीम इंडियाला सल्ला


वाचा- अंग तापानं फणफणत असताना नीरज पोहोचला लाल किल्ल्यावर; म्हणाला, 'आतापर्यंत फक्त...'

गावस्कर म्हणाले की भारतीय संघाने यष्टीरक्षक रिषभ पंतची रिव्ह्यूसाठी मदत घ्यावी, त्यानंतरच अंतिम निर्णय घ्यावा. कारण यष्टीरक्षक अशा प्रकारचे निर्णय घेण्यासाठई सर्वोत्तम ठरू शकतो. फक्त यष्टीरक्षकानेच रिव्ह्यू घेण्याबाबतचा निर्णय घ्यावा असे मला वाटते. कारण प्रत्येक गोलंदाजाला वाटते की फलंदाज बाद आहे. तर फलंदाजाला वाटत असते की मी बाद नाहीय. पहिला रिव्ह्यू बऱ्यापैकी जवळ जाणारा होता, पण दुसऱअया रिव्ह्यूवेळी पंत वारंवार नकार देत असतानाही कोहलीने रिव्ह्यू घेतला, असं गावस्कर म्हणाले. ते सोनी स्पोर्ट्स नेटवर्कशी बोलत होते.

वाचा- संधीच्या अभावामुळे भारतीय क्रिकेट सोडले पण अमेरिकेत देखील आले अपयश

यामुळेच कोहलीने केली चूक
भारताने पहिल्या डावात ३६४ धावा केल्या. पहिला डावात त्यांनी यजमान इंग्लंडला सुरुवातीला धक्के दिले होते. २३ धावांत २ विकेट गमावल्याने इंग्लंडच्या संघापुढील अडचणी वाढल्या होत्या. या दरम्यानच भारताने दोन रिव्ह्यू घेतले, जे अपयशी ठरले. सिराजने कोहलीला दुसऱ्यांदा रुटविरुद्ध रिव्ह्यू घेण्यास राजी केले, पण रिव्ह्यू अयशस्वी ठरला. यावेळी पंत रिव्ह्यू घेण्यास वारंवार नकार देत होता. गावस्कर म्हणाले की, 'कोहलीला रुटची विकेट हवी होती, म्हणूनच त्याने रिव्ह्यू घेण्यास लगेच सहमती दर्शवली. रुटला लवकर बाद केले, तर बाकीचा संघही लवकर गुंडाळता येईल, असे विराटला वाटले असावे.'

वाचा- INDvsENG : काय सांगता! शेवटची ओव्हर टाकण्यासाठी बुमराहला लागले १५ मिनिट

रुटनं झळकावलं शतक
दोन रिव्ह्यूमधून वाचल्यानंतर रुटने इंग्लंडच्या डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. आणि इंग्लंडच्या पहिल्या डावात शानदार शतक झळकावून भारतावर २७ धावांची आघाडीही मिळवून दिली. तो १८० धावांवर नाबाद राहिला. या मालिकेतील रुटचे हे सलग दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिज स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात १०९ धावा केल्या होत्या आणि आता दुसऱ्या कसोटी सामन्यातही त्याने चांगली फलंदाजी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज