अ‍ॅपशहर

टी-२० क्रिकेटमध्ये आजवर कोणाला जमले नाही; पहिली मॅच, पहिली ओव्हर आणि झाला विक्रम

Michael Bracewell: न्यूझीलंडने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ८८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात न्यूझीलंडच्या मायकल ब्रेसवेलने टी-२० मधील अनोखा विक्रम केला.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jul 2022, 10:24 am
नवी दिल्ली: आयर्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. मालिकेतील दुसऱ्या लढतीत न्यूझीलंडने ८८ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात न्यूझीलंडच्या एका खेळाडूने अनोखी कामगिरी केली, ज्याची चर्चा जगभरात होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Michael Bracewell


दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत १७९ धावा केल्या. उत्तरादाखल आयर्लंडला फक्त ९१ धावा करता आल्या. न्यूझीलंडकडून मायकल ब्रेसवेल याने पहिल्या टी-२० सामन्यात कमाल केली. ब्रेसवेलने पहिल्याच सामन्यात हॅटट्रिक केली. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पहिल्याच सामन्यात हॅटट्रिक घेणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

वाचा- कर्णधारपद मिळताच पुजाराने मोडला ११८ वर्षा पूर्वीचा विक्रम; आजवर एकाही भारतीय खेळाडूला जमले नाही

याआधी दोन्ही संघात झालेल्या वनडे मालिकेत ब्रेसवेलने पहिल्याच सामन्यात शतक झळकावले होते. तेव्हा न्यूझीलंडला अखेरच्या षटकात विजयासाठी २० धावांची गरज होती आणि ब्रेसवेलने ५ चेंडूत २४ धावा करत विजय मिळवून दिला. ब्रेसवेलने ८२ चेंडूत १२७ धावा केल्या होत्या.

वनडेनंतर आता टी-२० मालिकेत ब्रेसवेलने कमाल करून दाखवली. आयर्लंडच्या डावातील १४वी ओव्हर टाकण्यास ब्रेसवेल आला. ही त्याची पहिली ओव्हर होती आणि ती त्याला पूर्ण देखील करता आली नाही. ब्रेसवेलला फक्त पाच चेंडू टाकता आले. पण त्यात त्याने अशी कामगिरी केली जी आजवर कोणाला करता आली नाही.

वाचा-कर्णधार बदलला आणि कोच द्रविडला काय झालं? पाहा आतापर्यंत कधीही न पाहिलेला


वाचा- फक्त एक मॅच खेळला नाही आणि बुमराहला बसला मोठा झटका; जे कमावले होते तेच...

पहिल्या टी-२० सामन्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये ब्रेसवेलने हॅटट्रिक घेतली. त्याने मार्क अडायर, ग्लेन फिलिप्स आणि ईश सोढी यांना तिसऱ्या,चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर बाद केले.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख