अ‍ॅपशहर

जसप्रीत बुमराने रचला अनोखा विक्रम, ज्या दक्षिण आफ्रिकेत पदार्पण केलं तिथेच केली कमाल...

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या कसोटीत एक अनोखा विक्रम रचल्याचे पाहायला मिळाले. सर्नात महत्वाची गोष्ट म्हणजे बुमराने ज्या दक्षिण आफ्रिकेत पदार्पण केले होतो, तिथेच त्याला हा विक्रम रचण्याची संधी मिळाली.

Maharashtra Times 30 Dec 2021, 3:14 pm
सेंच्युरियन : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने पहिल्या कसोटीत एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. महत्वाचं म्हणजे ज्या दक्षिण आफ्रिकेत बुमराने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, त्याच देशात बुमराने ही कमाल केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम जसप्रीत बुमरा (सौजन्य-ट्विटर)

बुमराने पहिल्या कसोटीत कोणता विक्रम रचला, पाहा...
बुमराने आतापर्यंत या कसोटी सामन्यात भारताला महत्वाच्या विकेट्स मिळवून दिल्या आहेत, त्याचबरोबर बुमराने दक्षिण आफ्रिकेत एक मैलाचा दगड पादाक्रांत केला आहे. बुमराने यावेळी दुसऱ्या डावा दक्षिण आफ्रिकेच्या व्हॅन डर दुसेनला बाद केले आणि परदेशामध्ये शंभर बळी पटकावण्याचा पराक्रम केला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जेव्हा भारताला विकेट्सची गरज होती. तेव्हा बुमराने दुसेनला बाद करत संघाला संघासाठी मोलाची कामगिरी केली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने केशव महाराजला नाइट वॉचमन म्हणून पाठवले होते. बुमराने यावेळी भन्नाट यॉर्कर टाकत महाराजला बाद केले आणि भारताच्या विजयाचे दार उघडले. त्याचबरोबर बुमराने पाचव्या दिवशी सर्वात मोठी कमाल केली. भारताच्या विजयामध्ये मोठा अडसर बनला होता तो दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर. बुमराने अप्रतिम चेंडू टाकत एल्गरला पायचीत पकडले आणि संघाला मोठे यश मिळवून दिले. पहिल्या डावातही एल्गरला बाद करण्याचा मान बुमरानेच मिळवला होता. त्यामुळे आता दुसऱ्या डावात बुमरा किती विकेट्स मिळवतो आणि संघाच्या विजयात कसा हातभार लावतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

विराट कोहली का झाला होता नाराज, पाहा...दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू डीन एल्गर आणि केशव महाराज वेळ काढण्याचा प्रयत्न करत होत, यावर भारताचा कर्णधार विराट कोहली नाराज झाल्याचे दिसले. त्याने मैदानावरील अंपायरशी बोललेले स्टंप माइकच्या माध्यमातून सर्वांना ऐकू आले. रूल बुकमध्ये स्पष्टपणे लिहले आहे की, तुम्ही खेळ संपण्याच्या १० मिनिटे आधी ड्रिंक्स ब्रेक घेऊ शकत नाही. कोहलीने ही गोष्ट एल्गर याला देखील सांगितली. त्यानंतर एल्गरने एक छोटा ड्रिंक्स ब्रेक घेतला. एल्गरने दिवसाचा खेळ संपण्याचा दोन ओव्हर आधी ब्रेक घेतला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज