अ‍ॅपशहर

भारतीय क्रिकेटरच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी; १० लाखांच्या डीलवरून...

Jaya Bhardwaj: भारतीय क्रिकेट संघातील स्टार गोलंदाज दीपक चहरच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका डीलमध्ये जयाची १० लाखांची फसवणूक झाली आणि पैसे परत मागितल्यानंतर हा प्रकार झाला.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Feb 2023, 4:10 pm
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघातील स्टार गोलंदाज दीपक चहरच्या पत्नीला १० लाख रुपयांना फसवण्यात आले. रिपोर्ट्सनुसार दीपक चहरची पत्नी जयाला हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमधील एका माजी अधिकाऱ्याने फसवले आहे. दीपक चहरच्या वडिलांनी संबंधित माजी अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Deepak Chahar Wife Jaya Bhardwaj


दीपकच्या पत्नीने संबंधित अधिकाऱ्याला एका व्यवहारासाठी पैसे दिले होते. पण जेव्हा पैसे मागितले तेव्हा त्या अधिकाऱ्याने शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी देखील दिली. या प्रकरणी दीपकचे वडील लोकेंद्र चहर यांनी उत्तर प्रदेशमधील आग्राच्या हरीपर्वत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. FIRनुसार हैदराबादच्या पारिख स्पोर्ट्स विरोधात गुन्हा दााखल करण्यात आले आहे. एका डीलसाठी पारिख स्पोर्टसने जया यांच्याकडून १० लाख रुपये घेतले होते. पण डील झाली नाही आणि जेव्हा पैसे परत मागितले गेले तेव्हा ते दिले नाही. या प्रकरणी पारिख स्पोर्ट्सचे मालक ध्रुव पारिख आणि कमलेश पारिख यांच्याविरोधात FIR दाखल केला.

वाचा- IND vs AUS: कोण आहे भारतीय संघातला राजकुमार? नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडणार

दीपक चहरचे कुटुंबीय आग्र्यातील शाहगंजच्या मान सरोवर कॉलीनीत राहतात. ध्रुव आणि कमलेश पारिख यांनी दीपकची पत्नी जया यांच्यासोबत एक डील केली होती. या डीलनुसार ७ ऑक्टोबर २०२२ रोजी त्यांनी जयाकडून १० लाख रुपये घेतले होते आणि ते अद्याप दिले नाही. इतकच नाही तर पैसे मागितल्यावर त्यांनी जयाला शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

वाचा- भारताच्या वर्ल्डकप चॅम्पियनची क्रिकेटमधून निवृत्ती; आता आयुष्यभर जनतेची सेवा करणार

दीपक चहर हा भारतीय संघ आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळतो. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसके संघाने त्याला १४ कोटी रुपयांना संघात घेतले होते. मात्र दुखापतीमुळे तो अनेक महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. दीपकने अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच गेल्या वर्षी बांगलादेशविरुद्ध खेळली होती.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख